भावाचं निधन होऊनही तु मजा करतेस, लाज वाटत नाही का? निक्की तंबोली ट्रोल करणाऱ्यांना म्हणाली..

बिग बॉस फेम निक्की तंबोलीच्या भावाचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले. निक्कीचा भाऊ हा केवळ २९ वर्षांचा होता. त्यामुळे भावाच्या निधनानंतर तिच्या पुर्ण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. या दुखातून निक्की सावरत असतानाच तिला सोशल मिडीयावर ट्रोल केले जात आहे.

मात्र निक्कीने या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे. खतरों के खिलाडी या शोच्या अकराव्या सिजनमध्ये सामिल होण्यासाठी निक्की नुकतीच साऊथ अफ्रिकेला रवाना झाली आहे. त्यावेळी निक्कीने सोशल मिडीयावर इतर कलाकारांसोबत मजा मस्ती करतानाचे काही व्हिडीओज आणि फोटोज शेअर केले आहेत.

मात्र नेटकऱ्यांनी तिने फोटो टाकताच तिला वेठीस धरण्यास सुरूवात केली. काही दिवसांपुर्वीच भावांच निधन झालेलं असताना निक्की मौज मजा करत आहे हे नेटकऱ्यांना आवडलं नाही. त्यामुळे अनेकांनी निक्कीला ट्रोल केले आहे. त्यांना उत्तर देताना निक्कीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे.

यात तिने ट्रोल करणारे मुर्ख लोक आहेत असे म्हटले आहे. निक्की तिच्या पोस्टमध्ये म्हणाली आहे की काही मुर्ख लोक मला मेसेज करत आहेत की काही दिवसांपुर्वीच तुझ्या भावाचे निधन झाले आहे तुला लाज वाटत नाही का? तु मजा करतेस.

ती पुढे म्हणाली की मी या मुर्खांना सांगू इच्छिते की माझं पण स्वताचं आयुष्य आहे. मलाही आनंदी राहण्याचा हक्क आहे. माझ्यासाठी नाही तर माझ्या भावासाठी ज्याला मला आनंदी पाहून खुप समाधानी वाटायचं. आणि हे लोक ज्यांच्याकडे काही काम नाही ते फक्त कमेंट करणे आणि नकारात्मक विचार पसरवण्याचे काम करतात.

अशा लोकांना माझी विनंती आहे की जा तुमची स्वप्न पुर्ण करा. यामुळे तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला आणि तुमच्या जीवलगांना आनंद होईल, अशा शब्दात तिने ट्रोल करणाऱ्यांची बोलती बंद केली आहे. दरम्यान, निक्की तंबोलीने खतरोंके खिलाडीमध्ये सामिल होण्याआधी सांगितले होते की तिच्या भावाची इच्छा आहे की तिने हा शो करावा.

महत्वाच्या बातम्या
का करते मेकअपला विरोध?; साई पल्लवीने सांगितले ‘No MAKE-Up’ निर्णयाचे खरे कारण
एका परदेशी अभिनेत्रीला केवळ ‘या’ गाण्यामुळे भारतीयांनी डोक्यावर घेतले होते; रातोरात झाली होती फेमस
महिलांच्या या सवयीवरून त्यांना मिळाली बिझनेसची भन्नाट आयडिया, आता आहे हजारो कोटींचा मालक
‘मुझसे दोस्ती करोगी’ चित्रपटात छोट्या करिना कपूरची भुमिका निभावलेली अभिनेत्री आज दिसते ‘अशी’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.