वाझे कोणाला किती पैसे द्यायचा? एआयएला भेटली सगळी कागदपत्रे; होणार सगळी पोलखोल

 

 

 

सचिन वाझे प्रकरणामुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे.  प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याजवळ स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीकिनारी येथे सापडला होता.

त्यामुळे या प्रकरणात सचिन वाझेंना एनआयएकडून अटक करण्यात आल्यानंतर रोज वेगवेगळे खुलासे होत आहे. रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहे, अशात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आता एनआयएच्या तपासा दरम्यान काही पुरावे भेटले आहे. मुंबई पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दर महिन्याला लाच दिली जात होती, अशा प्रकारचे काही दस्तऐवज एनआयएला भेटले आहे.

गुरुवारी तपासासाठी एनआयएचे अधिकारी दक्षिण मुंबईच्या गिरगावमध्ये असणाऱ्या एका क्लबमध्ये गेले होते. त्यावेळी एनआयएला हे दस्तऐवज मिळाले आहे. या दस्तऐवजांचा तपास सुरू आहे, त्यामुळे ७ एप्रिलपर्यंत वाझे एनआयएच्या ताब्यात राहणार आहे.

अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, या क्लबमध्ये वाझे बऱ्याचद यायचे. इथेच वाझे यांनी नरेश गौर आणि आरोपी विनायक शिंदेंना नोकरीला सुद्धा लावले होते, आता ते दोघे पण एनआयएच्या ताब्यात आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.