Share

NHM CHO Recruitment : NHM अंतर्गत महाराष्ट्रात 1974 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, अर्जाची शेवटची तारीख जाणून घ्या

NHM CHO Recruitment : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission – NHM) अंतर्गत महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ठरलेल्या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे. या भरतीद्वारे एकूण 1974 पदे भरली जाणार आहेत.

जाहिरातीनुसार, समुदाय आरोग्य अधिकारी (Community Health Officer – CHO) या पदासाठी ही मोठी भरती होत आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये उपलब्ध असलेल्या या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता म्हणून आयुर्वेदिक मेडिसिन पदवी (BAMS), युनानी मेडिसिन पदवी (BUHS), B.Sc (नर्सिंग) किंवा B.Sc (कम्युनिटी हेल्थ) स्वीकारली जाणार आहे.

अर्जदाराचे वय 04 डिसेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे या मर्यादेत असणे बंधनकारक आहे. मागासवर्गीय उमेदवारांना नियमानुसार 5 वर्षे वयोमर्यादा सवलत दिली जाईल. परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गासाठी ₹1000 असून, मागासवर्गीय व अनाथ प्रवर्गासाठी ₹900 निश्चित करण्यात आले आहे. निवड प्रक्रिया कशी असेल याबाबतची सविस्तर माहिती आणि परीक्षा दिनांक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी ही भरती असल्याने नोकरी ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र राहील. अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन प्रणालीचा वापर करावा लागेल. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 04 डिसेंबर 2025 अशी जाहीर करण्यात आली आहे. ही भरती आरोग्य व्यवस्थेला बळकटी देणारी ठरणार असून, ग्रामीण व शहरी भागातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी ही मोठी संधी मानली जात आहे.

 

 

 

 

ताज्या बातम्या व्यवसाय

Join WhatsApp

Join Now