भारीच! ५० रूपयांत १००० किलोमीटर चालते ‘ही’ ई-सायकल, फोनसारखी होते चार्ज; किंमत फक्त…

मुंबई | नेक्सजू मोबिलिटीने दोन नव्या इलेक्ट्रिक सायकल बाजारात उतरवल्या आहेत. या सायकल मेड इन इंडिया असून त्यांच्या देखभालीसाठी खुप कमी खर्च येतो. असा दावा करण्यात आला आहे.

नेक्सजू मोबिलिटीचे Rompus+ आणि Roadlark  हे दोन ई-सायकल मॉडेल उपलब्ध आहेत. ग्राहकांची बदलती मागणी आणि गरज लक्षात घेऊन या साईकल बनवण्यात आल्या आहेत. अतुल्य मित्तल यांनी २०१५ मध्ये सुरू केलेल्या अवान मोटर्सने पुण्यात नेक्सजू मोबिलिटी म्हणून स्टार्टअप केला आहे.

या सायकलच्या निर्मितीचा किस्सा खुप मजेशीर आहे. अतुल्य हावर्ड बिजनेस स्कूलचे विद्यार्थी होते. याशिवाय ते पापा जॉन इंडियचे गुंतवणूकदार होते. ही भारताची सर्वात मोठी पिझ्झा डिलिव्हरी साखळी आहे.

त्यांना पिझ्झा डिलिव्हरीसाठी स्वस्त आणि दमदार अशी इलेक्ट्रिक स्कूटर मिळाली नाही. आपल्या व्यवसायात असा अडथळा आल्याने अतुल्य मित्तल यांनी स्वस्त:च इलेक्ट्रिक सायकलची निर्मिती करण्याचे ठरवले.

ई-सायकल चालवणे खिशाला परवडणारे आहे. आर्थिक खर्चाचा विचार केला असता यासाठी प्रतिकिलोमीटर फक्त ०.२ रुपयांचा खर्च येतो. तर पेट्रोल-डिझेल चे वाहन चालवण्यासाठी प्रतिकिलोमीटरला २ रुपयांपेक्षा जास्त खर्च येतो.

अहवालानुसार, ई-सायकल १० रुपयांच्या चार्जमध्ये तब्बल १५० किलोमिटर पर्यांत धावू शकते.  तर ५० रुपये चार्ज करण्यासाठी खर्च केल्यास सायकल १००० किलोमीटर पर्यंत धावणार आहे. नेक्सूजू मोबिलिटीच्या Rompus+  या इलेक्ट्रिक सायकलची किंमत ३१,९८० रुपये ठेवली गेली आहे. तर Roadlark ची किंमत ४२,३१७ रुपये किंमत ठेवली आहे.

सायकलचे डिझाईन आणि निर्मिती पुर्ण भारतात केली गेली आहे. ती चार रंगात विक्रीसाठी उपलब्ध आहे. सायकलचे डिझाईन खुप आकर्षक आहे. ही सायकल खरेदी करण्यासाठी नेक्सजूच्या डिलरकडे किंवा कंपनीच्या वेबसाइटवर ऑनलाइन खरेदी करू शकता.

महत्वाच्या बातम्या-
मारुती सुझुकी लवकरच बाजारात आणणार नवीन इलेक्ट्रिक OMNI, किंमत असेल फक्त…
दमदार आणि आकर्षक लूकमध्ये महिंद्राची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; किंमत आहे फक्त
धमाका ऑफर! टाटा आणि महिंद्राच्या ‘या’ गाड्यांवर तब्बल ‘इतक्या’ लाखांचा डिस्काऊंट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.