पुढचे तीन वर्षे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहणार असतील तर आम्ही भाजपसोबत युतीला तयार; सेनेच्या बड्या मंत्र्याचे वक्तव्य

औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी एकाच व्यासपीठावर हजेरी लावली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ” आजी माजी आणि एकत्र आले तर भावी ” असा उल्लेख करत भाषणाची सुरुवात केली त्यांच्या या उल्लेखामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यामुळे पूर्वी सोबत असलेली भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र येणार का? अशा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी सर्वांसमोर मांडला आहे.

यानंतर मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना नेते अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांच्या प्रतिक्रिया विचारल्या असता यावेळी रावसाहेब दानवे म्हणाले, ” लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आम्ही एकत्र लढल्या लोकांनी आम्हाला जनमतही दिलं आणि आमचं बहुमत सुद्धा आलं पण काही राजकीय घडामोडी घडल्या आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेली आणि त्यांनी सरकार बनवलं आम्ही विरोधी पक्षात बसलो.

पुढे ते म्हणाले, ” पण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे वक्तव्य केलं तर मला अस वाटत की, भविष्यात जर असं काही घडलं तर जेवढा आनंद आम्हाला होईल तेवढा आनंद आमच्या मतदारालाही होईल कारण दोघांचा मतदार एकच आहे अशी प्रतिक्रीया रावसाहेब दानवे यांनी दिली.

यावेळी शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांना शिवसेना आणि भाजप युती बद्दल विचारले असता ते म्हणाले,” हे अधिकार फक्त पक्षप्रमुखांना आहेत. आणि पक्ष प्रमुख जो निर्णय घेतील तो शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या दोघांनाही मान्य राहील. फक्त माझी एकच विनंती आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुढचे तीन वर्षे मुख्यमंत्री राहणार असतील तर सहजासहजी युती होणं अवघड नाही, अस अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय पटलावरून वेगवेगळ्या प्रतिक्रीया येत आहेत. त्यामुळे आता पुन्हा शिवसेना आणि भाजप हे पक्ष एकत्र येणार का? हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

महत्वाच्या बातम्या
शिवसेना भाजप पुन्हा युती होणार? राजकारणात काहीही घडू शकते एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य..
महाविद्यालयात बुरखा घालून महिलांच्या खोलीकडे जात होती व्यक्ती, शिक्षिकांनी बुरखा काढला तर बसला धक्का
रिविलिंग ड्रेस घातल्यामुळे नोरा फतेही झाली ओप्स मुव्हमेंटची शिकार, सर्वांसमोरच ड्रेस करावा लागला नीट; पहा व्हिडीओ
गाई नव्हे आईच! आठव्या महिन्यापासून सई पिते गाईच्या आचळाने दूध, गाईचा लागलाय लळा..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.