येत्या काही दिवसात पावसाची राज्यभरात तुफान फटकेबाजी, ‘या’ जिल्ह्यांना जारी केले ऑरेंज अलर्ट

ऑगस्टमध्ये रजेवर गेलेल्या पावसाने पुन्हा एकदा राज्यात हजेरी लावली असून गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात पाऊस मनसोक्त बरसताना दिसत आहे. पुढचे ४ दिवस हवामान खात्याने मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

के एस होसाळीकर यांनी ट्वीटरवर दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र येत्या ४८ तासात तीव्र (depression) होण्याची आणि वेस्ट-नॉर्थवेस्ट दिशेने येत्या २,३ दिवसात सरकण्याची शक्यता आज IMD ने वर्तवली. परिणामी राज्यात येत्या ४,५ दिवसात काही ठिकाणी मुसळधार-अतीमुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई ठाणे सहीत अनेक भागांमध्ये १२ ते १४ सप्टेंबर दरम्यान अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईसह उपनगरात आणि राज्यातील अनेक भागांमध्ये पुन्हा पावसाचा वेग वाढला आहे. हवामान विभागाने पुढचे ४८ तासांसाठी मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या दोन विभागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

तसेच कोल्हापूर जिल्यात पावसाचा जोर वाढला असून बळीराजा सुखावला आहे. ऑगस्ट महिन्यात दडी मारलेल्या पावसामुळे बळीराजा काहीसा चिंतेत होता. मात्र सप्टेंबरमधील पावसाच्या या कमबॅकने बळीराजाला धीर दिला आहे. तसेच जिल्यातील अनेक धरण १०० टक्के भरली आहेत त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून अनेक बंधारे पाण्याखाली गेली आहेत.

काही भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि नदीचं पाणी वाढलं असून शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. यंदाच्या सप्टेंबर महिन्यातील पाऊस हा मागील काही वर्षांच्या तुलनेत सरासरी जास्तच पडणार असून हवामान खात्याने मान्सूनच्या परतीच्या पावसाला विलंब होईल, अशी शक्यता वर्तवली आहे.

 

महत्वाच्या बातम्या
“मुख्यमंत्री बदलून पंतप्रधानांचे अपयश झाकले जाणार नाही, म्हणून मुख्यमंत्री नाही पंतप्रधान बदला”

अबब! तब्बल २४ वर्षांनंतर लिफ्टचे दरवाजे उघडले, आत काय आहे पाहून सर्वांचेच धाबे दणाणले…

मानलं बुवा! इस्त्रायलमधील कैद्यांचा आगळावेगळा प्रताप; चमचाने बोगदा खाणुन तुरूंगातून काढला पळ
“जाताय तर जा पण जाता जाता १२ आमदारांच्या फाईलवर सही करून जा, तेवढंच पुण्य मिळेल”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.