सध्या पाकिस्तानी क्रिकेट टीम ही न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. पण याचदरम्यान पाकिस्तानच्या सहा खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. आणि पाकिस्तानचे खेळाडू कोरोनाच्या नियमांचे पालन करत नसल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे न्यूझीलंड सरकारने पाकिस्तानी खेळाडूंना इशारा दिला आहे की, जर यापुढे एकदाही नियम मोडला तर पूर्ण संघाला पाकिस्तानला परत पाठवण्यात येईल. ही माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ वसीम खान यांनी दिली आहे.
ईसपीएन क्रीकइन्फोने यासंदर्भात वृत्त दिले आहे. हा प्रकार घडल्यानंतर वसीम खान यांनी पाकिस्तानच्या टीमला व्हाट्स अँप व्हॉइस मेसेज पाठवला आहे. ज्यात ते म्हणाले आहेत की, त्यांनी टीमने तीन ते चार वेळा नियम मोडल्याचे सांगितले आणि आपल्याला शेवटची ताकीद देण्यात आली आहे असे सांगितले.
हा तुमच्यासाठी कठीण काळ आहे आणि इंग्लंडमध्येही तुम्हाला याच परिस्थितीला तोंड द्यावे लागेल. गोष्टी सोप्या नसल्या तरी आपल्या देशाच्या मानाचा मुद्दा आहे. १४ दिवसांत तुम्हाला हॉटेलमध्ये जायचं आणि फिरण्याचं स्वातंत्र्य मिळेल.
पण आता जर तुम्ही नियम मोडला तर आपल्याला थेट पाकिस्तानला पाठवले जाईल. पाकिस्तानमधून आल्यानंतर टीमला क्राईस्टचर्चमध्ये १४ दिवस ठेवण्यात आले होते. तेथेच खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले.
लाहोरमधून निघताना त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली होती असा दावा पाकिस्तानने केला आहे. कोरोना झालेल्या ६ खेळाडूंना वेगळे ठेवण्यात आले आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानचे खेळाडू कोरोनाबाबतचे नियम पाळत नसल्याचे प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘अर्णब पाठोपाठ कंगना प्रकरणात ठाकरे सरकारचं थोबाड फुटलं’
मनोजकुमारने डिंपलला रात्री १२ वाजता फोन करून हाॅटेलवर बोलावले व दिली ‘ही’ आॅफर