न्युझिलंडचा दौरा रद्द करण्यामध्ये भारताचा हात; पाकिस्तान म्हणतंय, महाराष्ट्रातून आला धमकीचा ई-मेल

काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानमध्ये होणारी पाकिस्तान विरुद्ध न्युझिलंड अशी एकदिवसीय मालिका रद्द करण्यात आली आहे. न्युझिलंडने सुरक्षेच्या प्रश्नामुळे हा दौरा रद्द केला असल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर लगेचच इंग्लंड क्रिकेटनेही पाकिस्तानचा दौरा रद्द केला आहे.

हे दोन्ही दौरे रद्द झाल्यामुळे पाकिस्तानने भारतालाच दोषी ठरवलं आहे. भारतामुळेच न्युझिलंडने आपला पाकिस्तान दौरा रद्द केला असल्याचे पाकिस्तानचे सुचना मंत्री फवाद चौधरी यांनी म्हटले आहे. न्युझिलंडला भारतातून धमकीचा ईमेल आला होता, असा धक्कादायक आरोप त्यांनी केला आहे.

श्रीलंकन खेळाडूंवर झालेल्या गोळीबारानंतर कोणताही संघ पाकिस्तान दौऱ्यासाठी जात नव्हता. पण गेल्या काही वर्षांपासून पुन्हा काही संघांनी पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यास सुरुवात केली होती. श्रीलंकेनंतर आता न्युझिलंडचा संघही पाकिस्तान दौऱ्यावर होता.

पाकिस्तान विरुद्ध न्युझिलंड असे ३ एकदिवसीय सामने आणि ५ टी-२० सामने खेळवण्यात येणार होते. पहिला वनडे सामना १७ सप्टेंबर रोजी सुरु होणार होता. पण सामन्याच्या काही वेळापूर्वीच हा सामना रद्द करण्यात आला. पण त्यानंतर न्युझिलंडने दौरा रद्द करण्याला भारत कारणीभूत असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.

ऑगस्ट महिन्यात तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानचा दहशतवादी एहसानुल्लाह एसनच्या नावाने एक धमकीची पोस्ट न्युझिलंडला आली होती. पण त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यानंतर ते दौऱ्यासाठी पाकिस्तानला आले होते. पण त्यानंतर आणखी एक धमकीचा ई-मेल आला.

धमकीच्या पोस्टमध्ये हम्जा आफ्रिदी नावाच्या आयडीचा वापर करण्यात आला होता. हा ई-मेल भारतातील महाराष्ट्र राज्यातील एका उपकरणावरुन आला होता, या गोष्टी अधिकाऱ्यांच्या तपासातून समोर आल्या आहे, असे चौधरी यांनी म्हटले आहे.

तसेच हा मेल पाठवताना लोकेशन सिंगापूर दाखवण्यात आले होते. पण संबंधित उपकरणावरील मेल आयडी हे भारतातील आहे. भारताचं असं वागणं दुर्दैवी आहे. भारत या खेळाविरुद्ध असून आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाने यावर लक्ष देऊन योग्य ती कारवाई करायला हवी, असेही चौधरी यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

निवडणूक लढायची असेल तर कमीत कमी १० झाडं लावा, नाहीतर निवडणूक लढता येणार नाही
‘दरेकर काहीही चुकीचे बोललेले नाहीत, पुणे पोलिसांनी बावळटपणा केला आहे’
महानायक अमिताभ बच्चन झाले मराठमोळ्या काॅमेडीकिंग समीर चौगुले समोर नतमस्तक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.