New UPI Rule: सरकारनं असा निर्णय घेतला की, गावाकडच्या बँकांच्या फेऱ्यांनी हैराण झालेल्या शेतकरी, मजूर आणि लहान व्यावसायिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. अगदी मोबाईलमधून UPI अॅप उघडायचं आणि सोनं ठेवून घेतलेलं कर्ज असो किंवा FD मधली रक्कम सहजपणे घरी बसूनच व्यवहार शक्य होणार आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (National Payments Corporation of India) ने UPI संदर्भात एक नवा निर्णय घेतलाय जो येत्या 1 सप्टेंबर 2025 पासून लागू होईल.
याअंतर्गत, UPI वापरकर्ते आता गोल्ड लोन (Gold Loan), पर्सनल लोन (Personal Loan), बिझनेस लोन (Business Loan) आणि एफडीवरील (Fixed Deposit) रक्कम देखील आपल्या UPI अॅप्स जसं फोनपे (PhonePe), गुगल पे (Google Pay) किंवा पेटीएम (Paytm) यांच्यावरून काढू शकणार आहेत. आतापर्यंत फक्त बचत खाती आणि काही ओव्हरड्राफ्ट खाती UPI शी लिंक करता येत होती. काही रुपे क्रेडिट कार्ड (RuPay Credit Card) याचाही समावेश झाला होता, मात्र आता कर्ज खाते सुद्धा थेट UPI शी जोडता येणार आहे.
ग्रामीण भागासाठी विशेष फायद्याची सुविधा
या नव्या निर्णयामुळे शेतकरी, किरकोळ व्यापारी किंवा छोट्या उद्योजकांना वारंवार बँकेला जावं लागणार नाही. कर्ज घेऊन त्या रकमेचा वापर शिक्षण, हॉस्पिटल किंवा व्यवसायासाठी घरबसल्या करता येईल. बँक प्रत्येक खात्यासाठी अटी ठरवेल.
नवे नियम – किती रक्कम काढता येईल?
-
UPI द्वारे दिवसाला जास्तीत जास्त ₹1 लाख इतकं पेमेंट करता येणार
-
रोख स्वरूपात काढण्याची मर्यादा मात्र ₹10,000 प्रतिदिन
-
P2P व्यवहारांची (वैयक्तिक व्यक्ती ते व्यक्ती) मर्यादा 20 व्यवहार प्रतिदिन
-
P2PM म्हणजे व्यक्ती ते मर्चंट प्रकाराचे व्यवहारही आता शक्य
हे बदल लवकरच अंमलात येतील आणि डिजिटल व्यवहारांची व्याप्ती आणखी वाढेल. सर्वसामान्य माणूस, विशेषतः ग्रामीण भागातील नागरिक यामुळे तांत्रिकदृष्ट्या सक्षम होईल.