जेष्ठ समाजसेवक डॉक्टर प्रकाश आमटे काही दिवसांपूर्वी कॅन्सरचे निदान झाले आहे. डॉक्टर प्रकाश आमटे यांना दुर्मिळ असा हेअरी सेल ल्युकेमीया ब्लड कॅन्सर झाला आहे. डॉक्टर प्रकाश आमटे(Prakash Amte) यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. पण काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता.(New update about Prakash Amte’s health condition)
पण आता ता त्यांच्या प्रकृतीबद्दल नवीन माहिती समोर येत आहे. डॉक्टर प्रकाश आमटे यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टर प्रकाश आमटे यांचे चिरंजीव अनिकेत आमटे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. अनिकेत आमटे यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, “बाबांना काल परत ऍडमिट केले आहे. आता सर्व visitors ला डॉक्टरांनी प्रवेश बंद केला आहे. कृपया बाबांच्या फोन वर कॉल करू नये.”
“बाबांना ताप अजूनही आहे. गेली 5 दिवस झाले पुन्हा इन्फेक्शन झाले आहे आणि high fever आहे. आज बाबांच्या काही टेस्ट होतील. जे काही असेल त्या अपडेट सोशल मीडियावर टाकत जाईन. कृपया फोन करून तब्येत विचारू नका. कृपया त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना पण कॉल करून त्रास देऊ नये”, असे अनिकेत आमटे यांनी पोस्टमध्ये म्हंटले आहे.
अनिकेत आमटे यांनी पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, “माझ्या व्हॉट्सअप मेसेज वर बाबांच्या प्रकृतीबद्दल कधीतरी चौकशी करू शकता. मोबाईलवर पर्सनल मेसेज करून विचारपूस करावी ही विनंती. लगेच उत्तराची अपेक्षा करू नये. आपले प्रेम आणि काळजी आम्ही समजू शकतो पण या टेन्शन मध्ये आणि बिझी असल्याने उत्तर लगेच मिळेल ही अपेक्षा करू नये. समजून घ्याल ही अपेक्षा.”
“दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबांना भेटायला आल्यास खाली रजिस्टर ठेवले आहे त्यावर आपण शुभेच्छा संदेश, नाव, पत्ता, मोबाईल नंबर लिहावा.भेटीची अपेक्षा आणि आग्रह करू नये. बरे झाल्यावर हेमलकसाला नक्की भेटायला यावे”, अशी पोस्ट अनिकेत आमटे यांनी सोशल मीडियावर केली आहे. डॉक्टर प्रकाश आमटे पद्मश्री विजेते आणि ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांचे सुपुत्र आहेत.
डॉक्टर प्रकाश आमटे यांना त्यांच्या समाजकार्याबद्दल पद्मश्रीसह अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. डॉक्टर प्रकाश आमटे गेल्या ४९ वर्षांपासून ते गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथे महारोगी सेवा समितीच्या लोकबिरादरी प्रकल्प या नावाने आदिवासी लोकांसाठी दवाखाना चालवत आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
२९ वर्षीय आलिया भट्ट होणार आई, पण नक्की गर्भवती होण्याचं योग्य वय आहे किती? जाणून घ्या
आश्रमनंतर आणखी एका बोल्ड सिरीजने घातला धुमाकूळ, पाहिल्यानंतर तुम्हालाही फुटेल घाम
आलियाच्या गरोदरपणाची बातमी ऐकताच सासू नीतू कपूर झाली भलतीच खुश, हसत हसत म्हणाली..