सुशांत केसला नवे वळण! पोस्टमार्टमवर सीबीआयला डाऊट; उचलले ‘हे’ मोठे पाऊल

 

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा १४ जूनला वांद्रेच्या राहत्या घरी मृतदेह आढळून आला होता. पोलीस तपासात त्याने आत्महत्या केल्याची म्हटले जात आहे, मात्र याबाबत आता तपास सुरू आहे.

सुशांतच्या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करत आहे. तसेच या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहे, आता सुशांतच्या पोस्टमार्टम रिपोर्टवर सीबीआयने प्रश्न उपस्थित केले आहे. तसेच यासाठी एम्स डॉक्टरांचे एक पथक नियुक्त करण्यात आलेले आहे.

पथकाचे डॉ. सुधीर गुप्ता या पथकाचे नेतृत्व करणार आहे. सीबीआयने शवविच्छेदनावर काही प्रश्न उपस्थित केले आहे, शवविच्छेदनाच्या अहवालात टाइम स्टँप नाही. त्यामुळे वेळेचा कॉलम का नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पोलिसांनी याबाबत डॉक्टरांना प्रश्न विचारणे आवश्यक होते. मात्र पोलिसांनी असे केले नाही, असे सुधीर गुप्ता यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता अहवालाची पुन्हा पडताळणी करण्यात येणार आहे.

तसेच या अहवालाबाबत मुंबईतील डॉक्टरांशी बोलण्यात येणार आहे, त्यानंतर सविस्तर प्रतिक्रिया देण्यात येईल, असेही सुधीर गुप्ता यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सुशांतच्या शवविच्छेदन अहवालात शंका उपस्थित झाल्याने न्यायवैधक तज्ञांचे पथक सुशांतच्या शरीरावरच्या जखमांचा आणि इतर गोष्टींचा अभ्यास करून त्याचा अहवाल सीबीआयला सोपवणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.