देवमाणूस मालिकेत नवा ट्विस्ट; आता होणार ‘ह्या’ नव्या अभिनेत्रीची धमाकेदार एन्ट्री

मुंबई। छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांनी प्रत्येकाच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. यातील एक म्हणजे झी मराठी. झी मराठीवरील अनेक मालिका प्रेक्षकांच्या प्रचंड आवडत्या मालिका आहेत. संध्याकाळी ७ वाजल्यापासून ते रात्री १० पर्यंत अनेक जणांच्या घरी झी मराठीवरील सर्वच मालिका सुरु असतात.

‘देवमाणूस’ मालिकेने प्रेक्षकांवर अक्षरशः भुरळ घातली आहे. मालिकेत दररोज येणाऱ्या नवनवीन ट्वीस्टने चाहत्यांची उत्कंठा वाढवली आहे. प्रत्येकाने त्यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं आहे. आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समोर आलं आहे.

मात्र ही मालिका जरी प्रेक्षकांचा निरोप घेणार असली तरी या मालिकेत जाता जाता अजून एका धमाकेदार पात्राची एंट्री होणार आहे. व या नवीन चेहऱ्यामुळे आता मालिकेतील ट्विस्ट आणखी वाढणार आहे.

अभिनेत्री संजना काळे ही आता या मालिकेत एंट्री करणार आहे. आजच्या भागापासून मालिकेत आता हा नवा चेहरा पाहायला मिळणार आहे. ती डॉक्टरकडे चेकपसाठी आली आहे डॉक्टरचा व्हिडिओ टीव्हीवर पाहून ती इथवर आल्याचं तिने सांगितलेले आहे.

त्यामुळे आता ही मालिका आणखी मसालेदार होणार आहे. अभिनेत्री संजना काळे हिच्याबद्दल बोलायचे झालेच तर संजना हि ऍक्टर, डान्सर, कॉरोग्राफर म्हणून ओळखली जाते. संजना काळे कलर्स मराठीवरील बाळुमामाच्या नावानं चांग भल, फक्त मराठी वरील सप्तपदी ह्या मालिकांत काम केले आहे.

याशिवाय तिने गेट टू गेदर ह्या चित्रपटात हि महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे आता ही मालिका आता कोणतं नवीन घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
हॉकीतील भारताच्या विजयाचे वर्णन करताना रडू लागले कॉमेंटेटर, पाहा भावूक करणारा ‘हा’ व्हिडिओ
पूजा लोंढे हत्या प्रकरणी माहेर सिन्नरमध्ये तीव्र आक्रोश, नागरिक रस्त्यावर, नराधमांवर कारवाईची मागणी
सात टाके पडल्यानंतरही मागे नाही हटला हा पठ्ठ्या, वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सरशी नडला, पण…
पुजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड अडचणीत?, पोलिसांच्या हाती लागला ‘हा’ महत्वाचा पुरावा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.