मुंबई : कोरोना व्हायरसचा धोका सातत्याने वाढताना दिसत आहे. ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेननंतर जगभरात कोरोनाची भीती पुन्हा वाढली आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन आधीपेक्षाही जास्त धोकादायक असल्याचा इशारा एम्स प्रमुखांनी दिला आहे.
‘भारतात कोरोना विषाणू प्रती हर्ड इम्युनिटी होणे एक मिथक आहे. कारण ८० टक्के लोकसंख्येत कोरोना विषाणूप्रती अँटीबॉडी बनले पाहिजेत, जे हर्ड इम्युनिटी अंतर्गत संपूर्ण लोकशाहीच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे,’ असे डॉ. गुलेरिया यांनी म्हंटले आहे.
तसेच पुढे बोलताना डॉ. गुलेरिया म्हणतात, जर राज्यातील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनबाबत बोलायचे म्हटले तर, ते जास्त घातक सिद्ध होऊ शकतात. कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तीला पुन्हा नवा स्ट्रेन बाधित करु शकतो. धक्कादायक बाब म्हणजे अशा लोकांमध्ये अँटी बॉडीज तयार झाल्या असल्या तरी त्यांना बाधा होऊ शकते.
दरम्यान, ‘कोरोना विषाणूचे नवे म्यूटेशन किंवा स्ट्रेन विषाणूप्रती शरीरात होणाऱ्या प्रतिकारक क्षमतांमधून वाचण्यासाठी स्वतःच रस्ता शोधतात. असे स्ट्रेन लसीच्या माध्यमातून प्रतिकारक क्षमता प्राप्त करणारा किंवा कोरोनातून सावरण्यासाठी अँटीबॉडीज घेणाऱ्या व्यक्तींनाही पुन्हा बाधित करु शकतो, असा इशारा देखील डॉ. गुलेरिया यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
पुजाला यवतमाळला मारलं अन् पुण्यात आणून इमारतीवरून फेकलं; नातेवाईकांचा गंभीर आरोप
खरंच की काय? राखी म्हणतीये, ‘पोटाचा घेर वाढला तर रोमान्स होत नाही’
फक्त डिझेल टाका व ट्रॅक्टर न्या; सोलापूरचा तरूण शेतकऱ्यांना फुकट देतोय ट्रॅक्टर