Share

राज्यात आणखी एक घोटाळा उघड, एवढ्या जणांनी तलवारबाजीचे बोगस प्रमाणपत्र दाखवून मिळवली पोलिसांत नोकरी

Scam-News

राज्यात सध्या अनेक घोटाळे समोर येत आहेत. महाराष्ट्रात शिक्षक भरती आणि पोलीस भरती प्रक्रियेमध्ये झालेले घोटाळे उघडकीस आले आहेत. अशातच आता बोगस क्रीडा प्रमाणपत्र मिळवून अनेकांनी सरकारी नोकरी मिळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही जणांनी तलवारबाजीत चॅम्पियन असल्याचे सांगून वेगवेगळ्या सरकारी विभागात नोकरी मिळवली आहे.(new scam opened in maharshatra state)

१४ जणांनी तलवारबाजीतील बोगस प्रमाणपत्र दाखवून कर आणि पोलीस विभागात नोकरी मिळवली आहे. यातील ७ जण फौजदार पदावर कार्यरत आहेत. तर ७ जण कर निरीक्षक आहेत. याबाबतचा अहवाल क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी ३० सप्टेंबर २०२१ रोजी राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यानां पाठवला आहे.

तलवारबाजी संघटनेचे महासचिव अशोक दुधारेंनी या १४ जणांची प्रमाणपत्रे सत्य असल्याचं प्रतिज्ञापत्र दिल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. पण अशोक दुधारेंनी आपल्या सहीचा दुरुपयोग झाल्याचे सांगितले आहे. त्यांनी बोगस प्रमाणपत्रात आपला कोणताही सहभाग नसल्याचे म्हंटले आहे. राज्याच्या क्रीडा मंत्रालयाने याची गंभीर दखल घेतली आहे.

राज्याच्या क्रीडा मंत्र्यांनी बोगस प्रमाणपत्राच्या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिलं आहे. यापूर्वी राज्यात ट्रांपोलिन खेळाचे तब्बल २८१ बोगस खेळाडू सापडले आहेत. या परकरणाची सध्या चौकशी सुरु आहे. राज्यामध्ये आईस हॉकी हा खेळ खेळला जात नाही. पण या खेळाचे दीडशे बोगस खेळाडू आढळले होते.

या सर्व प्रकरणांची चौकशी सुरु असतानाच आता राज्यात तलवारबाजीचे बोगस खेळाडू आढळले आहेत. या खेळाडूंनी बोगस प्रमाणपत्र सादर करून सरकारी नोकरी मिळवली आहे. या प्रकरणात एकूण १४ जणांनी बोगस प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवल्याचे चौकशीतून पोलिसांच्या समोर आले आहे.

पण अद्याप या १४ जणांबाबत पूर्ण माहिती मिळालेली नाही. या प्रकरणाचा सध्या तपास सुरु आहे. बोगस प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवणारी १४ कर्मचारी नक्की कोण आहेत? त्यांना बोगस प्रमाणपत्र नक्की कोणी दिली? यामागे कुणा- कुणाचा हात आहे? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. चौकशी केल्यानंतर सर्व माहिती समोर येईल असे, पोलिसांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या :-
रवि तेजाच्या चित्रपटाने रिलीजच्या आधीच घातला धुमाकूळ, प्री-बुकींगमध्ये कमावला बक्कळ पैसा
ही दोस्ती तुटायची नाय! तीन मित्रांचा प्रवास ठरला अखेरचा; अपघाताचा थरार वाचून येईल अंगावर काटा
शेअर बाजार उघडताच गुंतवणुकदारांचे अडीच लाख कोटी बुडाले, पण अदानी विल्मरचा जलवा सुरूच

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now