१ फेब्रुवारी २०२२ पासून बँकिंग(Bank) क्षेत्रात अनेक नियम बदलणार आहेत. जर तुम्ही बँकेचे ग्राहक असाल तर या बदलांबद्दल जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. १ फेब्रुवारीपासून बँकेच्या चेक पेमेंट(Check Payment), एटीएम(ATM) या व्यवस्थेमध्ये बदल होणार आहे. हा बदल तुमच्या खिशावर देखील परिणाम करणार आहे.(new rule given by bank which affect customers)
फेब्रुवारी महिन्यापासून बँक ऑफ बडोदा(Bank of Baroda), एसबीआय बँक(SBI Bank) आणि पीएनबी बँक(PNB Bank) व्यवहारांशी संबंधित नियम बदलणार आहेत. तसेच १ फेब्रुवारीपासून एलपीजी सिलिंडरच्या किमतीत देखील बदल होणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असलेल्या ग्राहकांसाठी १ फेब्रुवारीपासून ऑनलाईन व्यवहार करणे महाग होणार आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, १ फेब्रुवारीपासून २ लाख ते ५ लाख रुपये MPS द्वारे हस्तांतरित केल्यास २० रुपये + GST शुल्क आकारले जाणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने IMPS च्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांची मर्यादा वाढवली होती. ही मर्यादा ५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली होती. त्यामुळे आता तुम्ही एका दिवसात २ लाखांऐवजी ५ लाख रुपये ट्रान्सफर करू शकता.
१ फेब्रुवारीपासून बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांच्या चेक क्लिअरन्सशी संबंधित नियम बदलले जाणार आहेत. आता 1 फेब्रुवारीपासून चेक पेमेंटसाठी, ग्राहकांना सकारात्मक वेतन प्रणालीचे पालन करावे लागेल. म्हणजेच १ तारखेपासून चेक पेमेंटसाठी कन्फर्मेशन आवश्यक असेल. कन्फर्मेशन नसेल तर चेक परत केला जाईल. हा बदल १० लाख रुपयांवरील चेक क्लिअरन्ससाठी आहे.
पंजाब नॅशनल बँकेत खाते असलेल्या ग्राहकांसाठी उद्यापासून मोठा बदल होणार आहे. या बदलाचा ग्राहकांच्या थेट खिशावर परिणाम होणार आहे. तुमच्या बँकेच्या खात्यात पैसे नसल्यास आणि हप्ता किंवा गुंतवणूक अयशस्वी झाल्यास, तुम्हाला २५० रुपये दंड भरावा लागणार आहे. आतापर्यंत हा दंड १०० रुपये होता.
एटीएम (Bank ATM) फसवणूक रोखण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेने काही खास नियम केले आहेत. १ फेब्रुवारीपासून पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक नॉन-ईएमव्ही (EMV) एटीएम मशीनमधून पैसे काढू शकणार नाहीत. याशिवाय १ फेब्रुवारीला गॅस सिलिंडरच्या किंमतीत देखील बदल होणार आहेत. सर्व शहरांमध्ये गॅस सिलेंडरचे नवीन दार जाहीर केले जाणार आहेत.
तसेच १ फेब्रुवारी या दिवशी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे या दिवसापासून अनेक नियम बदलणार आहेत. करदात्यांना तसेच व्यापारी आणि नोकरदारांनाही या अर्थसंकल्पाकडून खूप अपेक्षा आहेत. कोविड-१९ च्या तिसर्या लाटेत सरकारने अर्थव्यवस्थेला चालना द्यावी आणि व्यवसाय वाढवण्यास मदत करावी, अशी व्यवसायिकांची अपेक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या :-
जागो ग्राहक जागो! ऑफरच्या नावाखाली ग्राहकांची होतेय फसवणूक, खाली होतोय खिसा
‘काही लग्नांच्या गाठी स्वर्गात नाही, नरकात बांधल्या जातात’, जोडप्याच्या वादावर हायकोर्टाची संतप्त प्रतिक्रिया
“हिंदुस्तानी भाऊला सोशल मीडियावर प्रस्थापित करून त्याला फेमस करणारी कंपनी भाजप”