Pooja Gaikwad : बीड (Beed) जिल्ह्यातील गेवराई (Georai) तालुक्यातील लुखामसला (Lukhamasla) गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांनी आत्महत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली आहे. एका नर्तकीच्या नादी लागून बर्गे यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आपले आयुष्य संपवल्याचे पोलिस तपासात उघड झाले. या प्रकरणी नर्तिका पूजा गायकवाड (Pooja Gaikwad) हिला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून नवनवीन खुलासे होत आहेत.
मंगळसूत्र आणि गूढ ‘S’
अलीकडेच पूजाचं आणखी एक जुनं इंस्टाग्राम अकाऊंट समोर आलं आहे. या अकाऊंटवर तिने अपलोड केलेल्या व्हिडीओंमध्ये गळ्यात मंगळसूत्र घालून नाचताना दिसत आहे. विशेष म्हणजे, या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने ‘बस तुम्हारे हो गये S’ असं लिहिलं आहे. त्यामुळे आता हा गूढ ‘S’ कोण, हा प्रश्न चर्चेत आला आहे. पूजाचं लग्न झालं होतं का, की फक्त रीलसाठी तिने मंगळसूत्र घातलं होतं, यावरही तर्कवितर्क सुरू आहेत.
गोविंद बर्गेसोबतचं नातं
पूजा गायकवाड ही सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील बार्शी (Barshi) तालुक्यातील वैराग (Vairag) येथील कला केंद्रात नर्तिका म्हणून काम करत होती. याच ठिकाणी दीड वर्षांपूर्वी गोविंद बर्गे यांची तिच्याशी ओळख झाली. ओळख लवकरच प्रेमात बदलली. पूजाने बर्गे यांच्याकडून पावणेदोन लाखांचा मोबाईल, सोन्याचे दागिने, जमिनीसह भावासाठी गाडी घेतल्याचं समोर आलं आहे. मात्र, पुढे जाऊन तिने बर्गेकडे बंगला व पाच एकर शेती आपल्या कुटुंबाच्या नावावर करण्याची मागणी केली.
ब्लॅकमेलचे आरोप
बर्गे यांनी तिला घर बांधून देण्याची तयारी दर्शवली, पण विद्यमान घर देण्यास नकार दिला. यानंतर पूजाने त्यांना धमकी दिली की, मागणी मान्य केली नाही तर तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करीन. या धमकीमुळे बर्गे यांचे मानसिक संतुलन बिघडले होते. काही दिवसांपासून पूजाने त्यांच्याशी बोलणं बंद केलं होतं, त्यामुळे ते अधिकच नैराश्यात गेले.
आत्महत्येची घटना
सोमवारी मध्यरात्री गोविंद बर्गे पूजाच्या सासुरे (Sasure) येथील घरी गेले होते. तिथं नेमकं काय झालं हे स्पष्ट नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी जवळपास त्यांच्या कारमधून त्यांचा मृतदेह आढळला. पोलिसांनी दरवाजा उघडला असता ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या अवस्थेत त्यांनी उजव्या कानशिलात पिस्तूल लावून गोळी झाडल्याचं समोर आलं. गोळी डोक्याच्या एका बाजूने जाऊन दुसऱ्या बाजूला बाहेर पडली होती.
View this post on Instagram
पूजाच्या दोन सोशल मीडिया अकाऊंटचा गूढ
घटनेनंतर पूजाची दोन वेगवेगळी इंस्टाग्राम अकाऊंट्स समोर आली आहेत. एका अकाऊंटमध्ये तिचे नृत्याचे व्हिडीओ आहेत, तर दुसऱ्यात गळ्यात मंगळसूत्र आणि गूढ ‘S’ साठी लिहिलेल्या पोस्ट दिसतात. त्यामुळे ती आणखी कोणासोबत गुंतलेली होती का, हा प्रश्न अधिकच गडद झाला आहे.