Share

भाजपला घाम फोडण्यासाठी विरोधकांनी आखली नवी योजना, राष्ट्रपती पद हातातून जाणार?

काही दिवसांपूर्वी देशातील पंजाब, उत्तर प्रदेश, मणिपूर, गोवा आणि उत्तराखंड या पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. या निवडणुकांमध्ये भाजपने चार राज्यांमध्ये विजय मिळवला होता. त्यामुळे सध्या पंजाब वगळता इतर चार राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. पंजाब राज्यात आम आदमी पक्षाचा(Aam Adami Party) विजय झाला आहे.(New plan by the opposition for president election)

यादरम्यान राज्यसभेच्या काही जागांसाठी देखील निवडणुका झाल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी म्हणजेच १६ एप्रिल रोजी विधानसभेच्या चार आणि लोकसभेच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. या जागा विरोधी पक्षांनी जिंकल्या आहेत. २४ जुलैपर्यंत देशाच्या नव्या राष्ट्रपतींची निवड होणार आहे.

यावेळी राष्ट्रपती पदाची निवडणूक अत्यंत रंजक ठरणार असल्याची माहिती जाणकारांनी दिली आहे. विरोधी पक्ष देखील राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहेत. भारताच्या राष्ट्रपतींची निवड इलेक्टोरल कॉलेजद्वारे केली जाते. या इलेक्टोरल कॉलेजमध्ये दोन्ही सभागृहांचे खासदार आणि सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आमदारांची मते समाविष्ट केली जातात.

या निवडणुकीत आमदारांच्या मतांपेक्षा खासदारांच्या मतांना अधिक महत्त्व असते. सध्या १७ राज्यांमध्ये एनडीएचे सरकार आहे. यावेळी राष्ट्रपती निवडणुकीच्या इलेक्टोरल कॉलेजमध्ये सुमारे १०.९ लाख गुण आहेत. राज्यसभेत २३४ सदस्य आहेत, तर लोकसभेत ५३९ सदस्य आहेत. या ७७३ खासदारांचे ५ लाख ४७ हजार २८४ गुण आहेत.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे इलेक्टोरल कॉलेज पाहता संसद आणि विधानसभेत विरोधकांकडे ५१.१ टक्के गुण आहेत, तर भाजपकडे ४८.९ टक्के आहेत. या अर्थाने एनडीए आघाडी २.२ टक्के गुणांनी मागे आहे. त्यामुळे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजयासाठी भाजपला विरोधी पक्षातील सदस्यांचा पाठिंबा मिळवावा लागणार आहे. विजयासाठी भाजपला बाहेरून किमान १.१ टक्के समर्थन म्हणजेच ११,९९० गुणांची आवश्यकता असणार आहे.

सध्या सर्व विधानसभा आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण ४,०३३ आमदार आहेत. या सर्व आमदारांकडे ५ लाख ४६ हजारांहून अधिक गुण आहेत. सध्या १७ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात भाजपचे सरकार आहे. मात्र, या राज्यांमध्ये केवळ ६ मोठ्या राज्यांचा समावेश आहे. नऊ राज्यांमध्ये आमदारांच्या मताचे मूल्य ३० गुणांपेक्षा कमी आहे.

याउलट विरोधी पक्ष केवळ ११ राज्यांमध्ये सरकार चालवत असले तरी यातील आठ राज्ये मोठ्या राज्यांच्या श्रेणीत येतात. काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष NCP, RJD, DMK, IUML यांचे संसदेत एकूण १३६ खासदार आहेत. म्हणजे ९६,२८८ गुण आहेत. तर भाजपचे संसदेत ४४२ खासदार आहेत. त्यामुळे ३ लाख १२ हजार ९३७ गुण आहेत.

TMC, SP, AIMIM, TDP या पक्षांचे संसदेत १२८ खासदार आहेत आणि त्याचे एकूण ९०,६२४ गुण आहेत. तसेच वायएसआरसीपी, बीजेडी, टीआरएस आणि अपक्ष खासदार मिळून ६७ सदस्य होत आहेत. यांचे एकूण ४७,४३६ गुण आहेत. आमदारांच्या संख्येचा विचार करता विरोधी पक्षांचे गुण भाजपपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे सर्व पक्ष एकत्र आल्यास राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपचा पराभव होईल, असे जाणकारांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या :-
अमित शहा इन ऍक्शन मोड! हिंसा करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई, दिले ‘हे’ आदेश
बाळासाहेबांवर प्रेम असेल तर त्या खाल्ल्या मिठाला जागा, राज्याची बदनामी करू नका- सुप्रिया सुळे
महाराष्ट्राचे सुपुत्र जनरल मनोज पांडे यांची लष्करप्रमुख पदी निवड, वाचा त्यांची धडाकेबाज कारकीर्द

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now