केक आणि बरंच काही! पूजा चव्हाण-संजय राठोडांच्या नव्या फोटोंनी राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

मुंबई : पूजा चव्हाण कथित आत्महत्याप्रकरणावरून भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून, ठाकरे सरकासह विशेष करून शिवसेनेवर निशाणा साधला जात आहे. या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर भाजपाकडून आरोप करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राठोड गायब असून त्यांचा फोनही लागत नाहीये.

नॉट रीचेबल असलेले वनमंत्री राठोड उद्या पोहरादेवीला येणार असल्याची माहिती देवस्थानाच्या महंतांनी दिली आहे. तर दुसरीकडे पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांचे नवे फोटो व्हायरल होत आहेत. त्यानंतर आता पुन्हा अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

तसेच या नवीन फोटोंमध्ये पूजा चव्हाणच्या हातामध्ये एक केक आहे. या केकवर वनमंत्री संजय राठोड असे, स्पष्टपणे लिहलेले आढळत आहे. तर काही फोटोंमध्ये पूजा चव्हाण आणि संजय राठोड एकत्र पाहायला मिळत आहेत. या नवीन फोटोंमुळे या प्रकरणाला आता आणखीनच नवीन वळण लागले आहे.

या नवीन फोटोंमध्ये राठोड यांचा फोटो असलेले दोन केक समोर आले आहेत. यामध्ये एका केकवर वनमंत्री संजय राठोड असे लिहिलेले आहे. तर दुसऱ्या फोटोवर ‘गबरू’ असा शब्द दिसत आहे. गबरु लिहलेल्या केकवर वनमंत्री संजय राठोड यांचे नाव लिहलेले आहे. तर दुसऱ्या काही फोटोंमध्ये वनमंत्री संजय राठोड असे लिहलेला केक पूजाच्या हातात दिसतो आहे.

संजय राठोडांसाठीचा ‘तो’ मेसेज होतोय व्हायरल…
संजय राठोड समर्थकांकडून स्वागताची जोरदार तयारी सुरू झाली आहे. या संदर्भात व्हॉट्सअॅप ग्रुप सक्रिय झाले असून “चलो पोहरादेवी चलो पोहरादेवी” ही मोहिम व्हॉट्सअॅपवर राबविण्यात येत आहे.

राठोड समर्थकांकडून व्हॉट्सअॅपसह इतर सोशल मीडियावर मंगळवारी सकाळी ११ वाजता पोहरादेवीत एकत्र जमण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अनेक व्हॉट्सअॅप ग्रुपवर याबद्दलचे मेसेजही व्हायरल होत आहेत. राठोड यांना पाठिंबा देणं गरजेचे आहे. अन्यथा समाजाचं नुकसान होईल, अशा आशयाचे मेसेज सध्या विविध ग्रुप्सवर व्हायरल करण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या
मिताली मयेकरच्या ‘मंगळसूत्रा’ची सर्वत्र चर्चा; पहा तुफान व्हायरल झालेले खास फोटो
सावधान! तुम्हाला पूजा शर्माचा व्हिडीओ कॉल तर नाही येत? मुंबईत सेक्सटॉर्शनचा पर्दाफाश !
खुशखबर! ‘या’ बँकेची धमाकेदार बचत योजना; फक्त ५ रुपयांमध्ये उघडा खातं आणि मिळवा १ लाख

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.