‘या’ देशात संसदेचा नवीन कायदा; लैंगिक शोषण करणाऱ्याला औषध देऊन करणार नपुंसक

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये लैगिंक शोषणाच्या अनेक घटना घडत आहेत. असे असताना आता एक कठोर कायदा करण्यात आला आहे. यामुळे आता हे कृत्य करताना अनेकदा विचार केला जाईल. पाकिस्तानच्या संसदेने लैंगिक शोषणासंदर्भात एक विधेयक पास केले आहे. याला सर्वांनी पाठिंबा दिला आहे.

यामध्ये लैंगिक शोषण करणाऱ्या दोषीला औषध देऊन नपुंसक बनवले जाणार आहे. यामुळे अशा गोष्टींना आळा बसण्यास मदत होणार आहे. पाकिस्तानमध्ये सध्या लैंगिक अत्याचाराच्या घटना रोजच घडत आहेत. यामुळे याला अनेकजण कंटाळले आहेत. लोकांमध्ये आक्रोश आहे.

यामुळे पाकिस्तान सरकारने हे पाऊल उचलत संसदेत लैंगिक अत्याचारासंदर्भात हे विधेयक मांडले. आता संसदेने या विधेयकाला मंजूरी दिली असून त्याचा नवीन कायदा केला आहे. यामुळे आता या गोष्टींना आळा बसणार आहे. याबाबत कडक कायदा करण्याची मागणी केली जात होती.

या कायद्याअंतर्गत दोषींना औषध देऊन नपुंसक बनवले जाणार आहे. अधिसूचित बोर्डाच्या मार्गदर्शनाखाली याची अंमलबजावणी केली जाणार आहे. कायद्यामध्ये ही तरतूद आहे की घटनेची तक्रार दाखल झाल्यानंतर सहा तासाच्या आत पीडितेची तपासणी केली जाणार आहे.

पाकिस्तानच्या संसदेच्या संयुक्त सत्रात ३३ इतर विधेयकांसोबत सादर करण्यात आले होते. यामध्ये लैंगिक अत्याचाराशी निगडीत विधेयक देखील पास झाले आहे. या कायद्याअंतर्गत पाकिस्तान दंड संहिता १८६० आणि दंड प्रक्रिया संहिता १८९८ मध्ये सुधारणा होणार आहे.

यामुळे आता या घटना कमी होणार की नाही, हे लवकरच समजेल. पाकिस्तानमध्ये या घटना मोठ्या प्रमाणावर होतात मात्र आरोपी सापडत नाहीत. अनेक मुली देखील याबाबत माहिती देत नाहीत. यामुळे घटना वाढत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.