आता पंधरा मिनिटे जास्त काम केले तरी ओव्हरटाईम मिळणार, सरकार लवकरच घेणार निर्णय

कामगार मंत्रालय नवीन कायदा आणण्याच्या तयारीत आहे. सरकार याला शेवटचे रूप देण्याच्या तयारीत आहे. नवीन नियम लागू झाल्यानंतर देशातील कामगार बाजारातील नया दौर सुरू होणार आहे. तसेच सरकार त्यांच्या सगळ्या शंकांचे निरासरण करण्याच्या तयारीत आहे.

हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार नियमांमध्ये बदल केल्यानंतर सध्याच्या कामाच्या वेळात बदल करण्यात येणार आहेत. नियम लागू झाल्यांनंतर १५ मिनिटांपेक्षा जास्त काम केले तर त्याला ओव्हरटाईम मानले जाईल.

कंपनीला आपल्या कर्मचऱ्यांना त्यांचे ओव्हरटाईमचे पैसै द्यावे लागणार आहेत. जर कामाचे तास संपले तरी तुम्ही काम करत असाल आणि जर तुम्हाला काम करून पंधरा मिनिटांपेक्षा जास्त वेळ झाला असेल तर कंपनी तुम्हाला ओव्हरटाईम देणार.

म्हणजे कामाचा वेळ संपला तरी तुम्ही काम करत असाल तर कंपनीला तुम्हाला ओव्हरटाईमचे पेमेंट द्यावे लागणार आहे. याआधी जुन्या नियमांच्या अंतरर्गत ही सीमा अर्धा तसाची होती. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे आणि या महिन्याच्या शेवटी यावर निर्णय घेण्यात येईल.

यानंतर या निर्णयांना लागू करण्याची प्रक्रिया सुरू होईल. नया कायद्यामध्ये कंपनीला सुनिश्चित करावे लागेल की कर्मचाऱ्यांना पीएफ आणि ईएसआई सारख्या सुविधा मिळाव्यात. या नियमांनुसार कंपनी अशी कारणे देऊ नाही शकत की, कामगार हा कॉन्ट्रॅक्टर किंवा थर्ड पार्टीकडून आला आहे. तसेच या कामगारांना पुर्ण पगार मिळेल याची दखल घेतली जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या
सोशल मिडियावर शिल्पा शेट्टीने पहिल्यांदाच शेअर केला मुलीचा व्हिडिओ; पाहा व्हिडिओ
महाराष्ट्राच्या इतिहासातील रणरागिणी ‘छत्रपती ताराराणी’ साकारणार सोनाली कुलकर्णी; पहा फस्ट लुक
जाणून घ्या केळाच्या फुलांचे फायदे; हृदयविकारापासून ते मधुमेहापर्यंत सर्व रोगांवर आहे उपयुक्त
मेकअप न करता ‘अशा’ दिसतात बॉलीवूडच्या अभिनेत्री; फोटो बघून शॉक व्हाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.