ज्यावेळी तुम्ही शेअर बाजारातून जास्त पैसा कमावण्याचा विचार करता त्यावेळी तुम्हाला वॉरन बफे(Wareen Buffe), राकेश झुनझुनवाला आणि राधाकिशन दमानी यांसारख्या लोकांचे उदाहरण दिले जाते. पण आजच्या काळात शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना हैदराबादमधील एका २३ वर्षीय युवकाचे उदाहरण दिले जात आहे. (New Jhunjhunwala is ready! 100 crore earned from stock market)
या २३ वर्षीय युवकाचे नाव संकर्ष चंदा असे आहे. संकर्षने वयाच्या १७ व्या वर्षापासून शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरवात केली. संकर्ष चंदा हे सध्या जवळपास १०० कोटींचे मालक आहेत. संकर्ष चंदा केवळ शेअर बाजारात गुंतवणूक करत नाहीत, तर त्यांची एक स्टर्टअप कंपनी देखील आहे. Svobodha Infinity Investment Advisors Private Limited नावाच्या फिनटेक स्टार्टअप कंपनीचे ते संस्थापक आहेत.
Svobodha Infinity Investment Advisors Private Limited ही कंपनी लोकांना शेअर बाजार, म्युच्युअल फंड आणि बाँडमध्ये गुंतवणूक करण्यास मदत करते. २०१७ मध्ये संकर्ष चंदा यांनी आपले शिक्षण शिक्षण अर्धवट सोडत ३५ लोकांसह ही कंपनी सुरु केली. या कंपनीमध्ये त्यावेळी संकर्ष चंदा यांनी ८ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती.
संकर्ष चंदा बेनेट युनिव्हर्सिटीमधून B.Tech कॉम्प्युटर सायन्सच्या पदवीचा अभ्यास करत होते. पण शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीची आवड त्यांनी शिक्षणअर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला. संकर्ष चंदा यांनी १२ वी चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर २०१६ मध्ये शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. सुरवातीला त्यांनी फक्त दोन हजार रुपयांची गुंतवणूक केली.
पण पुढच्या दोन वर्षात संकर्ष चंदा यांनी शेअर बाजारातून भरपूर कमाई केली. एका मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार, संकर्ष चंदा यांनी दोन वर्षात शेअर बाजारात सुमारे १.५ लाख रुपये गुंतवले होते. दोन वर्षांननंतर संकर्ष चंदा यांना १३ लाख रुपये मिळाले. कंपनी सुरू करण्यासाठी त्यांनी स्वतःजवळ असलेले आठ लाख शेअर्स विकले.
२०१६ मध्ये संकर्ष चंदा यांनी ‘आर्थिक निर्वाण’ नावाचे पुस्तक देखील लिहिले. हे पुस्तक ट्रेडिंग आणि गुंतवणूक यातील फरक स्पष्ट करते. संकर्ष चंदा सध्या करोडपती आहेत. पण त्यांचे राहणीमान अतिशय साधे आहे. बहुतेकवेळा ते टी-शर्ट आणि शॉर्ट्समध्ये असतात. महत्वाच्या बैठकीला किंवा कार्यक्रमामध्ये जायचे असल्यास संकर्ष चंदा खास कपडे घालतात.
महत्वाच्या बातम्या :-
अवघ्या २३ व्या वर्षी पठ्ठ्या बनला १०० कोटींचा मालक, शेअर मार्केटमधून कमावली कोट्यवधीची संपत्ती
…तर राज्यसभा निवडणूकीत परीणाम भोगावे लागतील; बच्चू कडूंनीही केली मुख्यमंत्र्यांची कोंडी
पाहताच क्षणी गडकरींनी ‘या’ इलेक्ट्रिक बाईकची घेतली टेस्ट ड्राइव्ह, भन्नाट फिचर्स अन् किंमतही कमी