प्रदुषण कमी करण्यासाठी आणि पेट्रोलची बचत करण्यासाठी सध्या बरेच लोक इलेक्ट्रिक स्कुटरकडे वळत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक लोकांनी नवीन इलेक्ट्रिक स्कुटर्स घेतल्या आहेत.
कारण सध्या पेट्रोलचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे लोक आता सध्याला इलेक्ट्रिक स्कुटर विकत घेत आहेत. ग्रामीण भागातही बरेच लोक आता या स्कुटर वापरू लागले आहेत. भारतात सध्या या गाड्यांची मागणी वाढत आहे.
हिरो आणि टीव्हएससह बऱ्याच मोठ्या कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक स्कुटर लॉन्च केल्या आहेत. सध्या एका मोठ्या कंपनीने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कुटर लॉन्च केली आहे जी एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल १०० किलोमीटर धावते.
भारतात दिवसेंदिवस या स्कुटर्सची मागणी वाढत आहे. अनेक बड्या कंपन्या या क्षेत्रात उतरल्या आहेत आणि नवनवीन भन्नाट प्रोडक्ट्स लॉन्च करत आहेत. EeVe India म्हणजेच इलेक्ट्रिक व्हेइकल इन इंडियाने आपल्या दोन भन्नाट स्कुटर्स लॉन्च केल्या आहेत.
EeVe Atreo आणि EeVe Ahava अशी त्या दोन स्कुटर्सची नावे आहेत. या दोन्ही स्कुटर्सचे मायलेज दमदार तर आहेच पण लुकलाही या खुप सुंदर आहेत. फीचर्समध्ये या स्कुटर्स बाकी स्कुटर्सला तोड देतात.
विशेष म्हणजे या दोन्ही स्कुटर्सच्या किंमती बाकीच्या स्कुटर्सपेक्षा कमी आहेत. Altreo ची किंमत ६४ हजार ९०० रूपये आहे आणि Ahava ची किंमत ५५ हजार ९०० रूपये इतकी आहे. Altreo ही स्कुटर एकदा चार्ज केल्यावर ९० ते १०० किलोमीटर धावते.
तर Ahava हिला चार्ज होण्यासाठी ७ ते ८ तासांचा वेळ लागतो. या स्कुटरची जास्तीत जास्त स्पीड २५ किलोमीटर प्रति तास इतकी आहे. ही सर्व माहिती EeVe इंडियाने दिली आहे. या कंपनीच्या बऱ्याच इलेक्ट्रॉनिक स्कुटर्स सध्या रस्त्यावर धावत आहेत.