Homeताज्या बातम्या५० टक्के कर्मचाऱ्यांनाच कामावर बोलवा, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने जारी केल्या नवीन...

५० टक्के कर्मचाऱ्यांनाच कामावर बोलवा, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने जारी केल्या नवीन गाईडलाईन्स

देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. राजधानी दिल्लीत ओमिक्रॉनचे रुग्ण वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे मंगळवारी दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे.

कोरोनाच्या प्रकरणांमध्ये होणारी वाढ पाहता, केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत. केंद्र सरकारच्या सर्व विभागांना जारी करण्यात आलेल्या आदेशात अनेक गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे.

कार्यालयांच्या वेळेपासून ते कार्यालयांमध्ये नियमित स्वच्छता राखण्यापर्यंत सरकारने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांचा उल्लेख करण्यात आला आहे. अशाच १० नवीन गाईडलाईन्सबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

१.सरकारच्या पुढील आदेशापर्यंत ५० टक्के कर्मचारी घरून काम करू करतील.
२. कोविड कंटेनमेंट झोनमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याची गरज नाही.
३.शासकीय कार्यालयांच्या वेळा सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० आणि सकाळी १० ते ६.३० या वेळेत विभागण्यात आल्या आहेत.
४. दिव्यांग आणि गर्भवती महिला कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
५. सचिव आणि त्यावरील अधिकाऱ्यांना नियमित यावे लागेल.
६. नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार आता केंद्रातील सर्व विभागांना त्यांचे रोस्टर तयार करावे लागणार आहे.
७. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे वेगवेगळ्या मिटींग घेण्यात याव्या.
८. कार्यालयांमध्ये नियमित स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. कार्यालय आणि तेथे ठेवलेल्या वस्तूंचे वेळोवेळी स्वच्छता करणे आवश्यक आहे.
९. कार्यालयातील कॉरिडॉर, कॅन्टीन इत्यादी ठिकाणी गर्दी जमवने रोखावे लागेल.
१०. वारंवार हात धुणे, मास्क लावणे, एकमेकांपासून अंतर ठेवणे या महत्त्वाच्या गोष्टी वेळोवेळी पाळाव्यात.

महत्वाच्या बातम्या-
Creta आणि Brezza ला मागे टाकून, Tata Motors ची ‘ही’ कार बनली नंबर वन
टाटाचा ‘हा’ शेअर करतो मालामाल, एका झटक्यात १२ हजारांचे झाले १ लाख
शिवसेनेची पहिली शाखा सुरू करणाऱ्या शिवसैनिकाने केली आत्महत्या; वाचा दर्दनाक कहाणी..