फेस मास्क वापरासंदर्भातील WHOच्या नव्या गाईडलाईन्स आणखी कठोर; घ्या जाणून

मुंबई | देशात कोरोना विषाणूचा धुमाकूळ सुरूच आहे. कोरोनावरील लस अजूनही बाजारात आलेली नाहीये. त्यामुळे आपण सध्या मास्कच्या मदतीने घराबाहेर पडत आहोत. सुरक्षित अंतर, स्वच्छता पाळून आपण सर्वजण कोरोना विषाणूशी लढा देत आहोत.

याचबरोबर आता जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी फेस मास्क वापरासंदर्भातील नव्या गाईडलाईन्स आणखी कठोर केल्या आहेत. यामध्ये कोरोनाचा जेथे प्रसार होत आहे, तेथील आरोग्य केंद्रांवरील प्रत्येक व्यक्तीने फेस मास्कचा वापर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

वाचा फेस मास्कसंदर्भात WHOच्या नव्या गाईडलाईन्स…
गाईडलाईन्सनुसार,  ज्या भागात कोरोना पसरत आहे. तेथे १२ वर्ष किंवा त्याहून अधिक वय असलेल्या सर्वांनीच मास्कचा वापर करावा. तसेच ज्याठिकाणी व्यवस्थितपणे हवेचे व्यवस्थापन नसेल, अशा घरांमध्येही पाहुने आल्यानंतर मास्कचा वापर करण्यात यावा.

याचबरोबर कोरोना विषाणूपासून वाचण्यासाठी सातत्याने हात धुण्यावरही भर द्यायला हवा. अशीही सूचना गाईडलाईन्समध्ये देण्यात आली आहे. फेस मास्क व्हायरसपासून संरक्षण देतात यामुळे याचा वापर करणे महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी फेस मास्क वापरासंदर्भातील नव्या गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या
सावधान! कोरोना लसीला संघटित गुन्हेगारी क्षेत्राकडून धोका; इंटरपोलने दिला इशारा
डॉ. शीतल आमटे – करजगी यांच्या मृत्युच्यादिवशी नेमकं काय घडलं होतं? घ्या जाणून
हेमा मालिनी- धर्मेंद्र पुन्हा झाले आजी-आजोबा; घरात एकाच वेळी डबल धमाका

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.