धक्कादायक! लसींमुळेच निर्माण होतायत कोरोनाचे नवे व्हेरिएंट, प्रसिद्ध साथरोग तज्ज्ञाचा दावा

मुंबई | जगभरात कोरोना महामारीने हाहाकार माजवला आहे. अशात अनेक देशांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम सुरु आहे. मात्र त्याचवेळी फ्रान्समधील नोबेल पुरस्कार विजेत्या प्राध्यापकाने एक धक्कादायक दावा केला आहे.

एकीकडे मोठ्या प्रमाणावर लसीकरण केले जात आहे. मात्र कोरोनाचा नवीन म्युटेटेड म्हणजे जणुकीय बदल असणारे विषाणू अधिक घातक ठरत आहेत. याबाबत प्राध्यापक ल्यूक मॉन्टैग्नियर यांनी एका मुलाखातीत कोरोना प्रतिबंधक लसीमुळे कोरोना विषाणू अधिक धोकादायक आणि रचनात्मक दृष्ट्या शक्तीशाली होत असल्याचे म्हटले आहे.

पुढे मॉन्टैग्नियर म्हणाले, लसींमुळे विषाणूंचा प्रसार थांबत नाही तर त्याचा उलट परिणाम होऊन विषाणू अधिक शक्तिशाली होतात. लसीकरणामुळेच कोरोनाचे नवीन विषाणू हे आधीच्या विषाणूच्या तुलनेत अधिक नुकसान करत असल्याचे दिसत आहे. असा दावा त्यांनी केला आहे.

तसेच, ‘लसीकरण ही अशी एक वैज्ञानिक आणि वैद्यकिय क्षेत्रातील चूक आहे जिच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. याची नोंद इतिहासात केली जाईल. कारण लसीकरणामुळे नवीन विषाणू तयार होत आहेत. असे मॉन्टैग्नियर यांनी मुलाखतीतील एका प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले आहे.

मॉन्टैग्नियर यांना २००८ साली नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. ते फ्रान्समधील प्रसिद्ध व्हायरोलॉजिस्ट म्हणजे साथरोगतज्ज्ञ आहेत. त्यामुळे त्यांनी व्यक्त केलेली शंका आणि दावा चर्चेचा विषय ठरला आहे.

मॉन्टैग्नियर यांच्या मुलाखतीच्या क्लिप अमेरिकेत सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्रत्येक देशामध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून येत आहे. लसीकरणाचा आलेख आणि मृतांचा आलेख जवळजळ समान असल्याचे अनेक देशांमध्ये दिसून येत असल्याचे निरिक्षण मॉन्टैग्नियर यांनी नोंदवले आहे. मी या साऱ्या गोष्टींवर बारीक लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या-
VIDE0: कोरोना रुग्ण एका झटक्यात बरा होणार! औषधासाठी तोबा गर्दी, ICMR करणार चाचणी
यांच्या कार्याला सलाम! ८ महिन्यांच्या गरोदर असताना घरबसल्या बनवले कोरोना चाचणीचे किट
तुमच्या भागात लस उपलब्ध आहे की, नाही Whatsapp वर कळणार; ‘ह्या’ नंबरवर फक्त एक मेसेज करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.