मंजूळाच्या एक्झिटनंतर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची ‘देवमाणूस’ मालिकेत होणार एन्ट्री

सध्या मराठी टेलिव्हिजनवर अनेक मालिका खुप प्रसिद्ध आहेत. काही मालिकांना तर टिआरपीमध्ये देखील हिंदी मालिकांना मागे टाकले आहे. मराठी मालिकांना प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे. त्यामूळे निर्माते देखील मालिकांमध्ये वेगवेगळे प्रयोग करत आहेत.

अशीच एक वेगळी मालिका सध्या झी मराठी वाहिनीवर सुरु आहे. या मालिकेचे नाव आहे ‘देवमाणूस’. मालिकेने खुप कमी वेगळात प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. सासू सुनेच्या भांडणाच्या गोष्टीवरुन देवमाणूस मालिकेची कथा खुप वेगळी आहे. म्हणून मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

देवमाणूस मालिकेला रोज नवनवीन वळणं मिळत आहे. मालिकेच्या स्टोरीप्रमाणे अनेक नवीन पात्र एन्ट्री करत आहेत. मालिकेतील मंजूळा आणि डॉक्टरच्या जोडीला प्रेक्षकांनी खुप पसंत केले होते. पण मंजूळाच्या जाण्याने सर्वांना धक्का बसला होता.

मंजूळाच्या एक्झिटनंतर मालिकेत पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. मालिकेत नवीन एन्ट्री होणार का मालिका तशीच पुढे जाणार असा प्रश्न सर्वांना पडला होता. पण मालिकेच्या नवीन प्रोमोमूळे मालिकेत नवी एन्ट्री होणार असल्याचे बोलले जात आहे.

देवमाणूस मालिकेत एका नवीन स्त्री पात्राची एन्ट्री होणार आहे. मालिकेत ज्या अभिनेत्रीची एनट्री होणार आहे. तिचे नाव आहे नेहा खान. नेहा खान हे हिंदी आणि मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध नाव आहे. तिने अनेक मालिका चित्रपटांमध्ये काम केले आहे.

नेहा मुळची अमरावतीची आहे. तिने वयाच्या पंधराव्या वर्षापासून मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात काम केले आहे. अतिशय लहान वयात तिने प्रिन्सेस ऑफ महाराष्ट्रा हा किताब जिंकला होता. त्यानंतर तिने मॉडेलिंग करायला सुरुवात केली.

बॅड गर्ल, काळे धंदे, शिकारी, गुरुकूल, मुंबई सिटी अशा मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. एवढेच नाही तर झी युवावरील डान्सिंग क्वीन कार्यक्रमामध्ये तिने सहभाग घेतला होता. तिने आत्तापर्यंत तिच्या करिअरमध्ये अनेक बोल्ड भुमिका साकारल्या आहेत.

त्यामूळे देवमाणूस मालिकेतील तिच्या भुमिकेबद्दल देखील प्रेक्षकांना खुप उत्सूकता आहे. या मालिकेत कोणत्या भुमिकेत दिसणार हे अजून समजलेले नाही. पण ती अतिशय बोल्ड भुमिका साकारणार असल्याचे बोलले जात आहे.

महत्वाच्या बातम्या –

‘फॅन्ड्री’ चित्रपटातील जब्याचा नवीन लुक पाहून तुम्ही त्याला ओळखू शकणार नाही

लग्नाआधीच बॉयफ्रेंडपासून गरोदर राहिल्या होत्या ‘या’ अभिनेत्री; तरीही लग्नानंतर नवऱ्याने दिल्ला सन्मान

‘स्टाइल’ चित्रपटातील अभिनेत्री आठवते का? फोटो पाहून तुमचा विश्वास बसणार नाही

समीर आठल्येच्या प्रेमात पागल झालेल्या अलका कुबलने स्वतः केले त्यांना लग्नासाठी प्रोपोज; वाचा पूर्ण किस्सा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.