‘ओव्हर अ‍ॅक्टिंगचे 50 रुपये कापा’ व्हिडीओमुळं उडवली नलू मावशीची नेटकऱ्यांनी खिल्ली

मुंबई। झी मराठीवरील अनेक मालिका चाहत्यांच्या घरा घरात पोहचल्या आहेत. अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे. अशातच अनेक कलाकार हे त्याच्या आगळ्यावेगळ्या भूमिकेमुळे आपली ओळख निर्माण करतात.

अशीच झी मराठीवरील सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ हि मालिका लोकप्रिय मालिका ठरली आहे. यातील अनेक कलाकार हे त्यांच्या मालिकेतील अभिनयामुळे प्रसिद्ध आहेत. यात नलू मावशी म्हणजेच स्वीटूची आई चांगलीच चर्चेत असते. यात सध्या ओम आणि स्वीटूची लव्हस्टोरी दाखवण्यात येत आहे.

मात्र त्याच्या या प्रेमकथेला स्वीटूच्या आईचा विरोध आहे. नुकताच मालिकेचा एक नवा प्रोमो रिलीज झाला. यामध्ये देखील ती स्वीटूबाबत संताप व्यक्त करताना दिसत आहे. विशेष म्हणजे दोघांचं संभाषण थांबवण्यासाठी ती स्वीटूचा फोन चक्क आगीत फेकून देते.

व या प्रोमो नंतर नलू मावशी चांगलीच ट्रोल झाली आहे. हा व्हिडीओ पाहून स्वीटूच्या आईची खिल्ली उडवण्यास ट्रॉलर्सनी सुरुवात केली आहे. “अरे हिच्याकडे कंगवा घ्यायला पैसे नाहीत आणि ही मोबाईल जाळते आहे”, “यांचे ओव्हर अॅक्टिंगचे पंन्नास रुपये कापा” अशा आशयाच्या कमेंट्स करत ट्रोलर्सने या सीनची यशेच्च खिल्ली उडवली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतील अनेक कलाकार हे कोणत्या ना कोणत्या कारणावरून चांगलेच चर्चेत असतात. या मालिकेतील कलाकारांची ऑफ स्क्रीन मजा मस्तीचेही व्हिडिओ व्हायरल होत असतात. व ते चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस येतात.

महत्वाच्या बातम्या
योगा दिनानिमित्त मलायकाचा “हा’ व्हिडिओ होतोय व्हायरल, फिटनेससाठी जिममध्ये गाळतेय घाम..
दिग्गज क्रिकेटपटूने मैदान सोडल्यावर धरली बॉलिवूडची वाट, ‘या’ चित्रपटात करणार लीड रोल
आळशी स्वभावामूळे वडील सलीम खानचे ‘हे’ स्वप्न पुर्ण करु शकला नाही सलमान खान
मोठी बातमी! राजकीय घडामोडींना वेग, शरद पवार, प्रशांत किशोर यांच्यात दुसऱ्यांदा बैठक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.