‘तारक मेहता…’मधील सोनूचा विचित्र अवतार पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले “तू डिस्नेला जायला हवं”

मुंबई। ‘तारक मेहता का उलटा चष्मा’या मालिकेने गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. गेले कित्येक वर्ष ही मालिका प्रेक्षकांना आपल्या विनोदाच्या जोरावर हसवत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकार हे त्यांच्या अभिनयाने चांगलेच चर्चेत आहेत.

अशातच अभिनेत्री निधी भानुशाली ही सध्या तिचा अभ्यास आणि वैयक्तिक आयुष्य एन्जॉय करत आहे. सध्या निधी अभिनय क्षेत्रापासून लांब आहे, पण तिच्या वैयक्तिक आयुष्याचे दर्शन ती सोशल मीडियावरून तिच्या चाहत्यांना देत असते.

निधी सोशल मीडियावर खुप ऍक्टिव्ह असते. तसेच तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते. तिचे इन्स्टाग्रामवरही ८ लाखांपेक्षा जास्त फॉलोवर्स आहे. तिचे अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात.

अशातच नुकतेच तिचे फोटो व्हाइराल होत आहेत. निधीने तिच्या फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. या फोटोत तिने पिंक स्पेगिटी टॉप परिधान केलंय. तिच्या कुरळ्या केसांचे तिने दोन हाफ बन बांधले आहेत. तर निळ्या रंगाच्या आयशॅडोसह निधीचा मेकअपही केला आहे. या फोटोत तिने दोन हुला हुप्स खांद्यावर घेतलेले दिसत आहेत.

निधीने फोटो शेअर करताच अनेकांनी तिच्या या फोटोला पसंती दिलीय. तर काही नेटकऱ्यांनी निधीच्या फोटोवर विचित्र कमेंट केल्या आहेत. एक युजर कमेंट करत म्हणाला, “तू चुकीच्या ठिकाणी काम करतेयस तू डिस्नेला जायला हवं”.

तर दुसरा म्हणाला, “ही काय होती आणि काय झाली.” तर आणखी एक नेटकरी म्हणाला, “तू खूप बदलली आहेस गं” अशा कमेंट्स करत निधीला नेटकऱ्यांनी सुनावलं आहे. या आधीही निधी अनेकदा तिच्या फोटोमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.
महत्वाच्या बातम्या
‘अपना टाइम आयेगा’ गाण्यावर अंकिता लोखंडेचा अप्रतिम डान्स; पाहायला मिळतोय अभिनेत्रीचा ‘स्वॅग’
करण जोहरला वाटते ‘या’ गोष्टीची भीती; विचार करूनच थरकाप होतो…
‘लग्नानंतरही हनी सिंगचे अनेक महिलांशी शारीरिक संबंध…’ बायकोने केले खबळजनक आरोप
“काय होतीस तू काय झालीस तू…”; ‘तारक मेहता…’मधील सोनूचा विचित्र अवतार पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.