तुम्हाला सुंदर बायको मिळाली, पण तुम्ही त्या लायकीचे नाहीत; अभिषेक बच्चनवर भडकला नेटकरी

फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोड्यांमध्ये ऐश्वर्या आणि अभिषेकच्या जोडीचा समावेश होतो. २००७ मध्ये दोघांनी लग्न केले होते. लग्नाच्या एवढ्या वर्षांनंतर देखील दोघे आनंदाने एकत्र राहत आहेत. गुरु चित्रपटाच्या शुटींग वेळी दोघांच्या प्रेम कहानीला सुरुवात झाली आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

अभिनेत्यांना, अभिनेत्रींना नेहमी नेटकरी ट्रोल करत असतात. त्यांच्या ट्रोलिंगला काहीजण उत्तरे देतात. तर काहीजण देत नाहीत. अभिनेता अभिषेक बच्चनला नेहमी त्याच्या चित्रपटांवरून ट्रोल केले जाते. पुन्हा एकदा त्याला एका युजर्सने ट्रोल केलं आहे.

अभिषेक बच्चनचा आगामी चित्रपट द बिग बुल 8 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. त्याचा ट्रेलर अभिषेकने सोशल मिडियावर शेअर केला होता. त्यानंतर एका नेटकऱ्याने त्याला ट्रोल केले आहे. तो म्हणतो की, “तुम्ही कोणत्याच गोष्टीसाठी लायक नाही आहात. पण मला या गोष्टीचा तुमचा खुप हेवा वाटतो की तुम्हाला इतकी सुंदर बायको मिळाली, जिच्या तुम्ही लायकचं नाही.”

नेटकऱ्याच्या या ट्रोलिंगवर अभिषेक बच्चन संतापला आहे. त्याने या ट्रोलर प्रतिउत्तर दिले आहे. अभिषेक म्हणाला, ठीक आहे आपल्या मताबद्दल धन्यवाद. फक्त हे जाणून घेऊ इच्छित आहे. आपण कोणाशी बोलत आहात, कारण आपण बऱ्याच लोकांना टॅग केले आहे. मला माहित आहे की इलियाना आणि निक्कीचे लग्न झाले नाही, म्हणून आम्ही (अजय, कुकी, सोहम) वाचलो. डिस्नेचेही वैवाहिक स्टेटस तपासावे लागेल. अशा शब्दात अभिषेकने उत्तर दिले आहे.

अभिषेक बच्चनने रण, शुट आऊट ऍट लोखंडवाला, सरकार, बंटी और बबली, धुम, गुरू, कभी अलविदा ना कहना, रावन, बोल बच्चन यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका निभावल्या आहेत.

दरम्यान अभिषेकचा आगामी चित्रपट ‘द बिग बुल’ काही दिवसातच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात अभिषेक बच्चनची मुख्य भूमिका आहे. अभिषेक बच्चन सोबत अभिनेत्री इलियाना डिक्रूज चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहे. हर्षद मेहताचा शेअर मार्केटमधील घोटाळा चित्रपटामध्ये दाखवण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-
अमृता खानविलकरचा कातिलाना अंदाज; फोटो सोशल मिडीयावर झाल्या व्हायरल
मते मिळवण्यासाठी उमेदवाराचा अनोखा फंडा, मतदारांचे धुत आहेत कपडे
केवळ एवढ्याश्या गोष्टीसाठी कंगना राणावत आणि संजय दत्तची मैत्री तुटली होती
सनी देओलमूळे धर्मेंद्रने बोनी कपूरला दिली होती धमकी; वाचा पुर्ण किस्सा

 

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.