तेव्ह महात्मा गांधीनाही पत्कारावी लागली होती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासमोर हार

 

भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक महत्वाचे नाव म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. तुम ‘मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूंगा’ असा नारा देणाऱ्या सुभाषचंद्र बोस यांचे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वाचे योगदान होते.

एकदा तर असे झाले होते, त्यांनी देशात आपला एक वेगळा पक्ष स्थापन करुन निवडणूक सुद्धा लढवली होती. चला तर मग जाणून घेऊया त्या ऐतिहासिक घटनेबद्दल…

१९३७ चा तो काळ होता जेव्हा काँग्रेसने सरकार बनवले होते. त्याकाळी असे म्हटले जात होते की आंदोलन करुन पुर्ण स्वराज्यावर कब्जा मिळवावा. १९३८ मध्ये जेव्हा नेताजी काँग्रेसचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी वाम पक्ष सोबत घेण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर १९३९ मध्ये नेताजी पुन्हा एकदा अध्यक्ष पदाच्या शर्यतीत आले. तेव्हा त्यांना देशात एक नवीन विचारधारा आणायची होती. तेव्हा त्यांनी आपले हे मत जनतेसमोर मांडले होते, पण सरदार पटेल, राजेंद्र प्रसाद आणि कृपलाणी यांना असे वाटत होते की, हे अध्यक्षाचे काम नाही.

या निवडणूकीत महात्मा गांधी यांच्या म्हणण्यावरुन सर्व नेत्यांनी पट्टाभि सीतारमैया यांना उमेदवार बनवण्यात आले. पण झाले असे की, निवडणूक नेताजी जिंकले. सीतारमैया यांना गांधीजी यांनी उमेदवार बनवले होते, त्यामुळे गांधीजी म्हणाले, हि माझी हार आहे.

त्यानंतर एक काळ असा पण आला जेव्हा ब्रिटिश सरकारसमोर दुसऱ्या विश्व युद्धाचे आव्हान समोर उभे राहिले. तेव्हा नेताजींना कळले, की हीच ती वेळ आहे जेव्हा आंदोलन केल्याने ब्रिटिश सरकारवर दबाव टाकून भारताला स्वातंत्र्य मिळवता येईल.

नेताजींना स्वतःवर विश्वास होता, पण बाकीचे नेते त्यांच्याशी सहमत नव्हते. तेव्हा नेताजींनी काँग्रेसला रामराम ठोकला आणि ‘फॉरवर्ड ब्लॅक’ नावाने आपला नवीन पक्ष स्थापन केला होता.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.