धोनीच्या वार्षिक उत्पन्नाचा आकडा तुम्हाला माहीत आहे का? वाचून धक्का बसेल

आंतराष्ट्रीय क्रिकेटच्या निवृत्तीनंतरही महेंद्रसिंह धोनी म्हणजे माही आपल्या चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. आपला खेळ आणि स्वभाव यामुळे धोनीचे चाहते खूप आहेत. त्यामुळेच धोनीला कॅप्टन कुल असे म्हणतात. आजही धोनी हे नाव एक ब्रँड आहे.

त्याच्या चाहत्यांच्या संख्येत अजूनही घट झालेली नाही उलट त्याचे चाहते वाढतच चालले आहेत. सध्या धोनी मुंबईत आपले घर बांधत आहे. तो आता मुंबईकर होणार आहे. पण आपल्यामधील अनेकांना असा प्रश्न नक्कीच पडला असेल की धोनीची वार्षिक कमाई किती आहे?

त्याच्या वार्षिक उत्पन्नाचा आकडा ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. सीए नॉलेजने दिलेल्या वृत्तानुसार धोनीची वार्षिक कमाई तब्बल ७६० करोड इतकी आहे. धोनीला क्रिकेटव्यतिरिक्त अनेक कंपन्यांकडून जाहिरातींच्या ऑफर्स येत असतात. त्यातून धोनीला बरेच उत्पन्न मिळत असते.

धोनी यातील बऱ्याच ऑफर्स स्वीकारत असतो. ज्यामुळे त्यांच्या संपतीत बरीच वाढ होते. दरम्यान यंदाच्या आयपीएलमध्ये धोनीला म्हणावी तशी चांगली कामगिरी करता आली नाही. चेन्नईच्या चाहत्यांच्या हाती यावेळेस निराशा लागली.

पण ती निराशा फार काळ टिकणार नाही. धोनी आता मुंबईत राहायला येणार असल्याचे चित्र दिसत आहे कारण त्याची पत्नी साक्षीने सोशल मीडियावर त्यांच्या मुंबईतील घराचे फोटो टाकले आहेत ज्याचे सध्या बांधकाम सुरू आहे. तसेच धोनीने अनेक नवीन व्यवसाय सुरू केले आहेत याच्याही चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.