गेल्या काही वर्षांपासून श्रीराम मंदिर चर्चेत होते. त्याचे कामही सध्या सुरु आहे. अशात नेपाळहून दोन शिळा अयोध्येत आणण्यात आल्या. माता सीतेचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जणकपूरमधून त्या दोन शिळा अयोध्येत आणण्यात आल्या आहे. ३५-४० टन वजनाच्या या दोन शिळा आहे.
विशेष म्हणजे या शिळांपासून श्रीराम आणि माता सीता यांच्या मूर्ती बनवल्या जाणार आहे. नेपाळी लोकांच्या भावनांचा आदर करत श्रीरामजन्मभूमी ट्रस्टने जानकी मंदिराला पत्र लिहून कालीगंडकी नदीतील या दोन शिळा काढण्याची विनंती केली होती. त्यानंतर त्या अयोध्येत आणण्यात आल्या आहे.
अयोध्येत आल्यानंतर या शिळांना खास जागी ठेवण्यात आले आहे. तिथे त्यांची पूजा केली जात आहे. या शिळेला शाळीग्राम दगड म्हटले जात आहे. पण आता ती शाळीग्राम शिळा नसून देवशिला आहे. दगडांवर संशोधन करणाऱ्या संशोधकानी हा दावा केला आहे.
सध्या दोन्ही शिळा अयोध्येतील रामसेवकपुरममध्ये ठेवण्यात आल्या आहे. तिथे सर्वत्र या शिळांचीच चर्चा सुरु आहे. मुर्ती साकारण्याआधी त्यांची पूजा केली जात आहे. पण यावर संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांनी जी माहिती दिली आहे, त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
संशोधक डॉक्टर कुलराज चालीसे यांनी सांगितले की, अनेक महिन्यांपासून या मोठ्या शिळांवर संशोधन सुरु आहे. या शिळा मौल्यवान आहे. या देवशिला असून त्यातून लोखंडी अवजारांनी म्हणजेच छन्नी हतोडी यांनी मूर्ती निर्माण करणे अशक्य आहे. त्यामुळे यातून मूर्ती तयार करायची असेल तर हिरा कापण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अवजारांचा वापर करावा लागेल.
लोखंडात ५ हार्नेस आढळतात, पण देवशिलामध्ये ७ हार्नेस आहे. त्यामुळे मूर्ती कोरणं शक्य नाही. त्यामुळे देवशिलावर जर मूर्ती बनवायची असेल तर हिरा कापणाऱ्या अवजारानेच बनवावी लागणार आहे, असे संशोधकांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
औरंगाबादवरून पुणे फक्त दोन तासांत गाठता येणार; गडकरींनी सांगितला ‘हा’ भन्नाट प्लान
IPL 2023 पूर्वी दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीचा मोठा निर्णय; युसूफ पठाणकडे सोपवले कर्णधारपद
‘ही’ ट्रिक वापरून हिंडेनबर्ग शॉर्ट सेलिंगमधून कमावते तुफान पैसा; आतापर्यंत अनेक कंपन्या केल्यात उद्ध्वस्त