नेहरुंनी १९४७ रोजी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणामुळेच महागाई वाढली – भाजप मंत्र्याचे वक्तव्य

देशात कोरोनामुळे हाहाकार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अनेक लोकांचे हाल होताना दिसत आहे. अनेक लोकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. अनेकजण हे बेरोजगार झालेले दिसून येत आहे. यातच महागाई प्रचंड वाढली आहे.

या पार्श्वभूमीवर पेट्रोल डिझेलचे किमतींमध्ये भरमसाठ होत आहे. यामुळे नागरिक त्रस्त झालेले दिसून येत आहेत. वाढत्या महागाईमुळे नागरिकांचे अक्षरशः हाल होताना दिसत आहेत. अनेक नागरिक सरकारवर नाराज झालेले आहेत. अनेक आरोप ते सरकारवर करत आहेत.

या पार्श्वभूमीवर भाजपच्या एका नेत्याने एक अजब विधान केले आहे. ते म्हणाले, महागाईची समस्या एका दिवसात उभी राहिलेली नाही. भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरुन केलेल्या भाषणातील चुकांमुळेच अर्थव्यवस्था ढासळण्यास सुरुवात झाली आहे.

मध्य प्रदेशातील वैद्यकीय शिक्षणमंत्री विश्वास सारंग यांनी हे विधान केले आहे. पहिले पंतप्रधान आणि त्यांच्या पक्षाने जर अर्थव्यवस्था योग्य स्थितीत ठेवली असती तर आज महागाई नियंत्रणात असती असं विश्वास सारंग यांनी म्हटलं आहे. ते भोपाळमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

काँग्रेसकडून वाढते इंधनदर आणि इतर मुद्द्यांवरुन आंदोलन करण्यासंबंधी विचारण्यात आले असता विश्वास सारंग यांनी म्हटलं की, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अर्थव्यवस्थेला खिळखिळी करत महागाई वाढवण्याचे श्रेय कोणाला द्यायचे असेल तर ते नेहरु कुटुंब आहे. यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे.

आपली अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असून नेहरुंनी त्याकडेच दुर्लक्ष केलं होतं असा आरोप केला. ७० टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून असून नेहरुंनी या क्षेत्राची चिंताच केली नाही. ग्रामीण अर्थव्यवस्था आत्मनिर्भर आणि टिकणारी होती.

नेहरुंनी आपली पाश्चिमात्य विचारसरणी लादली आणि ग्रामीण अर्थव्यवस्था संपवली, असं ते म्हणाले. सध्याच्या स्थितीसाठी नेहरुंची चुकीची धोरणं जबाबदार आहेत. औद्योगीकरण ठीक होत, पण शेती त्याचा मूळ आधार असणे गरजेचे होते असे ते म्हणाले.

ताज्या बातम्या

क्रिकेटर पांड्या बंधूंनी मुंबईत घेतले 8 BHK घर, किंमत ऐकून बसेल धक्का..

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील आप्पांनी मानले सर्वांचे आभार! त्यामागील कारण जाणून चाहते झाले भावूक…हृ

हदयद्रावक! भगत सिंह यांची भूमिका साकारताना चिमुरड्याचा गळफास लागून तडफडून मृत्यू

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.