राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत गोवा मुक्तिसंग्रामावर भाष्य केले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी गोव्यातील जनतेवर अन्याय केल्याची टीका केली आहे.(nehru-left-goa-in-slavery-for-15-years-for-his-international-image-modi)
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “हे वर्ष गोवा मुक्तीला ६० वर्षे पूर्ण होत आहे. सरदार पटेलांनी ज्या प्रकारे हैदराबाद आणि जुनागडसाठी रणनीती बनवली होती, तशीच रणनीती गोव्यासाठी बनवली असती तर गोव्याला १५ वर्षे फार गुलामगिरी सहन करावी लागली नसती. त्या वेळच्या पंतप्रधानांना जगात आपली प्रतिमा डागाळण्याचा धोका वाटत होता, म्हणून त्यांनी १५ वर्षे गोव्याला गुलामगिरीत ठेवले, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, “गोव्यात गोळीबार होत असताना पंडित नेहरूंनी सत्याग्रहींना मदत नाकारली होती. आपल्या पंतप्रधानांनी मी सैन्य पाठवणार नाही, असे सांगितले होते. काँग्रेस पक्षाने गोवा राज्यासोबत अत्याचार केला.” यावेळी पंतप्रधान मोदींनी पंडित नेहरूंच्या १५ ऑगस्टच्या भाषणाचा देखील उल्लेख केला.
पंतप्रधान मोदी काँग्रेसबाबत बोलताना म्हणाले की, “कौटुंबिक राजकारणातील पहिला अपघात हा प्रतिभेचा असतो. काँग्रेस नसती तर लोकशाही कुटुंबवादापासून मुक्त झाली असती. काँग्रेस नसती तर भारताने परदेशी संकल्पनांऐवजी स्वदेशी ठरावांचा मार्ग अवलंबला असता. काँग्रेस नसती तर शिखांचा नरसंहार झाला नसता. ”
“काँग्रेस नसती तर पंडितांना काश्मीर सोडावे लागले नसते. पंजाब राज्य पेटले नसते आणि सामान्य माणसाला मूलभूत सुविधांसाठी इतकी वर्षे वाट पाहावी लागली नसती. ज्यांनी आणीबाणी लादली ते लोकशाहीबद्दल बोलत आहेत. पूर्वी लहानसहान बाबींवर राष्ट्रपती राजवट लागू होत असे”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
राज्यसभेतील भाषणात पंतप्रधानांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा उल्लेख केला. आपण गेल्या ७५ वर्षांपेक्षा अधिक वेगाने प्रगती करू शकतो असे पंतप्रधानांनी सांगितले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, “सरकारने ठरवले आहे की २०० कोटींहून अधिकच्या निविदा बाहेरील लोकांना देण्यात येणार नाहीत. याचा फायदा देशातील एमएसएमई क्षेत्रालाही होणार आहे.
महत्वाच्या बातम्या :-
लतादीदींसाठी खुपच खास होता प्रभुकुंज, त्यांच्या घरातील ‘हे’ खास फोटो पाहिलेत का?
‘माझ्या आजोबांचं, बाबांचं रक्त सांडलंय इथं; असं म्हणणाऱ्या राहुल गांधींवर मोदींचा हल्लाबोल, म्हणाले…
मार्क झुकरबर्गला मोठा धक्का, फेसबूकचे एका दिवसात झाले तब्बल एवढ्या बिलीयन डॉलरचे नुकसान