अभिनेत्री नेहा पेंडसेचा नवऱ्यासोबत किस करताना व्हिडिओ होतोय व्हायरल, पाहा व्हिडिओ

मुंबई | मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक कलाकार आहेत जे आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करत असतात. त्यांच्यातील एक म्हणजे मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे. नेहा पेंडसेने अनेक हिंदी मराठी मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये काम करत चाहत्यांच्या मनामध्ये जागा निर्माण केली आहे.

सध्या नेहा पेंडसे ‘भाभीजी घर पर है’ मालिकेत अनिता भाभीची भूमिका साकारत  आहे. नेहाच्या सोशल मिडिया अकाउंटवरचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामध्ये नेहा तिच्या नवऱ्यासोबत ‘व्हॅलंटाईन डे’ साजरा करताना दिसत आहे.

 

 

नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करत त्याला कॅप्शन दिले आहे. त्यामध्ये ती म्हणते की, ‘हा माझा पती…  हॅपी व्हॅलंटाईन डे बेबी’… असं कॅप्शन दिलं आहे.

व्हिडिओमध्ये पाहू शकता की, नेहा स्वीमिंगपुल शेजारी उभे राहून तीचा पती शार्दूल सिंह याच्यासोबत किस करताना दिसत आहे. नेहाचा पतीसोबतचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खुप आवडला आहे. चाहत्यांनी तिच्या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. आतापर्यंत पाच लाख जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

नेहा पेंडसेने ११९९ मध्ये आपल्या करिअरची सुरूवात केली होती. मीठी मीठी बाते, हसरते, भाग्यलक्ष्मी, पडोसन या हिंदी मालिकांमध्ये भूमिका निभावल्या आहेत. तसेच दाग द फायर, दीवाने, देवदास, यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

दरम्यान नेहा पॆडसेचा पती शार्दूल सिंहचे आतापर्यंत दोन वेळा लग्न झालेले आहे. २०१७ मध्ये त्याचा घटस्फोट झालेला आहे.

महत्वाच्या बातम्या-
टिकटॉक स्टार समीर गायकवाडने केली आत्महत्या, नक्की आत्महत्येचे कारण काय?
करीनाच्या बाळाचा जन्म होताच ‘औरंगजेब’, ‘बाबर’ ट्रेंडमध्ये; जाणून घ्या कारणं
अखेर अक्षय कुमारने सांगितले सत्य; म्हणाला, या कारणामूळे मी मुलगी निताराला मिडीयापासून दुर ठेवतो
सोशल मिडियावर धुमाकूळ घालणाऱ्या श्वेताचे भन्नाट मिम्स व्हायरल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.