नेहा कक्करला प्रेग्नंट बघून सासुलाही बसला धक्का! म्हणाली, एवढ्या लवकर गुड न्युज..

प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर अनेकदा व्यावसायिक आयुष्यासह तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत असते. नेहाच्या लग्नानंतर अनेक वेळा तिच्या गर्भधारणेच्या अफवाही समोर आल्या आहेत.

तिच्या गर्भधारणेच्या चर्चेवर बोलताना नेहा कक्करने द कपिल शर्मा शोमध्ये सांगितले की, ‘ख्याल रख्या कर’ गाण्यात तिचा बेबी बंप पाहून तिच्या पतीच्या आईलाही वाटले की, नेहा खरोखरच गर्भवती आहे.

तिच्या प्रग्नेंसीच्या बातमीवर नेहा म्हणाली, ‘खरं सांगू, जेव्हा ‘ख्याल रख्या कर ‘हे गाणं आलं, त्यात. माझं पोट पाहून माझी सासू म्हणाली – बाळ, गोड बातमी फार लवकर दिलीस. त्यावर मी म्हणाली- आई, किमान तू तरी असे बोलू नकोस. आपल्या सर्वांना माहित आहे की, रोहनप्रीत आणि मी नुकतेच लग्न केले आहे.”

नेहाने असेही सांगितले की, रोहनप्रीतसोबत तिच्या लग्नावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. काही लोकांनी सांगितले होते की कदाचित ती आधीच गर्भवती आहे, म्हणून तिने लवकर लग्न केले.

काही दिवसांपूर्वी नेहाने अचानक ‘इंडियन आयडॉल 11’ मधून ब्रेक घेतला होता, त्यानंतर चर्चा रंगली की नेहा प्रेग्नेंट असल्यामुळे तिने शोमधून ब्रेक घेतला आहे. मात्र, याबाबत नेहाकडून कोणतीच माहिती समोर आली नाही.

अलीकडेच, नेहा तिच्या “कांटा लगा” या गाण्याच्या प्रमोशनसाठी “डान्स दिवाने ३” या रिॲलिटी शो मध्ये हजेरी लावली होती. ‘डान्स दीवाने ३’ या कार्यक्रमात नेहाला स्पर्धक गुंजनच्या डान्सने अतिशय प्रभावी झाली होती. नेहा कक्करने तिचे खूप कौतुक केले आणि सांगितले की, तिला सुध्दा अगदी असेच बाळ हवे आहे.

नेहाचे “कांटा लगा” हे गाणे रिलीज झाले आहे जे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हे गाणे सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हे गाणे नेहा आणि टोनी कक्कर यांनी गायले आहे आणि हनी सिंगने रॅप केले आहे. या गाण्याला आतापर्यंत 75 लाख व्ह्यूज मिळाले आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.