‘इंडिअन आयडल १२’ शोमधून नेहा कक्कड बाहेर; कारण ऐकून धक्का बसेल 

टीव्हीवरचा प्रसिद्ध रियालिटी शो ‘इंडियन आइडल १२ ‘ (indian idol १२) चे गेले अनेक दिवस  सिंगर नेहा कक्कड़, हिमेश रेशमिया,आणि विशाल डडलानी, जज बनले आहेत. पण, मागील काही भागांपासून नेहा शोमध्ये दिसली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार तिने कोणतातरी प्रोजेक्ट हाती घेतला आहे. त्यामुळे नेहा आता शोमध्ये दिसणार नाही.

तसेच महाराष्ट्रात लॉकडाऊन झाल्यामुळे हा कार्यक्रम मुंबईमधून दमन येथे  शिफ्ट होणार आहे. त्यामुळे हा शो तीनही जज मिळून सांभाळतील याची शाश्वती नाही. मिळालेल्या बातमीनुसार आता मनोज मुंतशिर आणि अनु मलिक शोचे जज म्हणून पाहायला मिळतील.

संगीतकार अनु मलिक इंडियन आयडलच्या मागील काही सीझनमध्ये जज कार्यरत होते. पण सोना मोहित्रा, नेहा भसीन आणि श्वेता पंडित यांच्या सारख्या गायिकांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केला तेव्हापासून त्यांना जज भूमिकेवरून निलंबित केले आहे.

कोरोना महामारीमुळे देशातील अनेक भागांमध्ये लॉकडाउन झाले आहे, त्यामुळे  इंडियन आयडलचे शुटींग लोकेशन देखील बदलली आहे. आता या शोचे शुटींग दमन येथे होईल. शुटिंगच्या वेळेस मोठ्या प्रमाणात खबरदारी घेतली जाते. त्यामुळे स्पर्धक आता नव्याने सज्ज झाले आहेत.

मुंबईत जोपर्यंत वातावरण सामान्य होत नाही तोपर्यंत शुटींग दमणमध्ये होणार आहे. इंडियन आयडल तेथूनच घराघरापर्यंत आपला आवाज पोहचवतील. परंतु आपल्या फेवरेट जजसाठी थोडी वाट पहावी लागेल. तसेच होस्ट आदित्य नारायण याला देखील कोरोना झाल्याचे समजते. त्यानंतर आता जय भानुशाली हा शो होस्ट करणार आहे.

काही दिवसांपासून नेहा शोमध्ये नसल्याने त्यांच्या फैंसमध्ये निराशा निर्माण झाली आहे. त्यातच अशी गोष्ट लक्षात आली की, नेहा आणि रोहनप्रीत यांच्या लग्नाला इतक्यातच सहा महिने पूर्ण झाले आहे. त्यामुळे ते दोघे एकमेकांना वेळ देवून आपल्या सुखाचा आनंद घेत आहे. तसेच नेहा ने आपल्या हस्बैंड रोहनप्रीत सिंह सोबतचे फोटोज इंस्टाग्राम वर शेअर केले आहे.

हे ही वाचा-a

एक नाही दोन नाही तर किशोर कुमारने केले आहेत चार लग्न; वाचा त्यांच्या पत्नींबद्दल

बाळासाहेब ठाकरे नाराज असत तेव्हा खोलीत एकाच माणसाला प्रवेश असे, ते म्हणजे दादा कोंडक

आसाराम बापूची प्रकृती गंभीर; जेलमध्ये झाली होती कोरोनाची लागण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.