…म्हणून नेहा कक्करने घाई घाईत केले होते लग्न

बॉलीवूडच्या सर्वात प्रसिद्ध गायकांपैकी एक म्हणजे नेहा कक्कर. लोकं तिच्या आवाजाची वेडी आहेत. पार्टी असो किंवा लग्न नेहा कक्करचे गाणे असणारच. नेहाशिवाय कोणताही कार्यक्रम पुर्ण होऊ शकत नाही.

बॉलीवूडमध्ये सध्याच्या घडीला सर्वात जास्त मागणी नेहाची आहे. एका नंतर एक असे तिचे अनेक गाणे येत असतात. गाण्यांसोबतच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामूळे देखील नेहमीच चर्चेत असते.

काही दिवसांपूर्वीच नेहाने रोहनप्रितशी लग्न केले आहे. तिच्या लग्नामुळे देखील ती खुप जास्त चर्चेत होती. २४ ऑक्टोबर २०२० ला नेहाने रोहनशी लग्न केले होते. तिच्या लग्नाच्या अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या.

नेहाच्या लग्नाच्या निर्णयामूळे सर्वांना धक्का बसला होता. तिने एवढ्या लवकर लग्न करण्याचा निर्णय का घेतला. याचे कारण कोणालाही माहिती नव्हते. पण आत्ता एवढ्या वर्षांनंतर खरे कारण समोर आले आहे. जाणून घेऊया नेहा कक्करच्या लग्नाचे कारण.

नेहाने एका मुलाखतीमध्ये तिच्या लग्नाबद्दल अनेक खुलासे केले आहेत. त्यात तिने लवकर लग्न का केले. याचे कारणही सांगितले आहे. त्यामुळे अनेकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत.

ती म्हणाली की,’मी लग्नाचा निर्णय घाई घाईत घेतला यामागे अनेक कारण आहेत. लोकांना वाटते की, मी चुकीचा निर्णय घेतला आहे. पण ही गोष्ट खरी नाही. माझा निर्णय बरोबर आहे आणि मी योग्य वेळी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे’.

ती पुढे म्हणाली की, ‘माझे वय ३२ वर्षे आहे. हे वय लग्नासाठी योग्य आहे. यापेक्षा पुढे जाऊ नये. असे मला वाटते’. नेहा आणि रोहनची भेट एका गाण्याच्या शुटींग वेळी झाली होती. दोघांच्या भेटीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न केले.

पहिल्या भेटीत रोहनला नेहा आवडला होती. म्हणून त्याने तिला प्रपोज केले. पण नेहाने त्याला नकार दिला. कारण तिचे म्हणणे होते की, आत्ता तिला लग्न करून सेटल व्हायला हवे. तिचे डेटिंगचे वय नाही. त्यामुळे ती रोहनला नाही बोलली होती.

काही दिवसांनी रोहनने स्वतः तिला मेसेज केला आणि लग्नाची विचारणा केली. रोहनचा हा अंदाज नेहाला आवडला. तिने लगेच रोहनशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांनी ऑक्टोबरमध्ये लग्न केले.

महत्वाच्या बातम्या –

माधूरी दिक्षित आणि नोरा फतेहीचा सोशल मिडीयावर धुमाकूळ; दोघींचा डान्स व्हिडीओ व्हायरल

बोनी कपूरमूळे होणार होता मौसमी चॅटर्जीचा घटस्फोट; ‘या’ व्यक्तीने वाचवला होता संसार

बोनी कपूरमूळे होणार होता मौसमी चॅटर्जीचा घटस्फोट; ‘या’ व्यक्तीने वाचवला होता संसार

हेराफेरीतील देवीप्रसादची नात आठवतेय? आता दिसतेय खूपच बोल्ड; पहील्यांदा तर ओळखणारच नाही

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.