दुबईच्या खोलीमधून नेहाचा हनिमूनचा व्हिडिओ व्हायरल; सोशल मिडीयावर धुरळा

मुंबई | बॉलिवूड गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत दुबईमध्ये हनीमून एन्जॉय करतायेत. दुबईतील फोटो नेहा आणि रोहनप्रीत त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असतात. तसेच दोघांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होतायेत.

नेहा आणि रोहन दुबईतील अटलांटिस-द पाम हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. नेहा आणि रोहनच्या मधुचंद्राचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहेत. अलीकडेच नेहाने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती दुबईमधील हॉटेलच्या खोलीत नृत्य करत आहे.

नेहाचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे. नेहा कक्करने इंस्टाग्रामवर तिच्या हनिमून दरम्यान रोमँटिक क्षण शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नवविवाहित जोडपे नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग खूप मस्ती करताना दिसत आहेत.

वाचा नेहा हनिमुनला गेलेल्या हॉटेलचं एक दिवसाचं भाडे..
नेहा आणि रोहनप्रीत ज्या हॉटेलमध्ये मुक्काम करतात ते हॉटेल खूप महाग हॉटेल आहे. हे ५ स्टार हॉटेल दुबई मधील सर्वोत्तम हॉटेल आहे.

नेहा आणि रोहन दुबईतील अटलांटिस-द पाम हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. अत्यंत विलासी आणि सुंदर ठिकाणी बनवलेल्या या हॉटेल रूममध्ये एक रात्रीचा मुक्काम लाखोंच्या किंमतीत आहे. हो, नेहा आणि रोहनप्रीत राहत असणाऱ्या या हॉटेलचे एका दिवसाचे भाडे १,०१,४८१ रुपये आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.