आज नेहा कक्करने (Neha Kakkar) बॉलिवूडच्या टॉप सिंगर्समध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. एकेकाळी माता की चौकीमध्ये गाणारी नेहा कक्कर (Neha Kakkar) आजही तिचे गरीबीतले दिवस विसरलेली नाही. नेहाने स्वतः तिच्या बालपणीच्या कठीण दिवसांबद्दल सांगितले आहे की, तिने वयाच्या 4 थ्या वर्षापासून तिची बहीण सोनू कक्करसोबत गाणे सुरू केले. (Neha Kakkar distributing 500-500 notes)
असे बरेच लोक आहेत जे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचल्यानंतर आपले भूतकाळातील दिवस विसरतात, परंतु नेहा तशी नाही. नेहा अनेकदा गरिबांना मदत करताना दिसत आहे, पण यावेळी असेच काही करायला गेलेली गायिका अडचणीत आली. नेहा कक्करचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सिंगर तिच्या कारमध्ये बसून गरीबांना 500-500 च्या नोटा वाटताना दिसत आहे.
नेहाला पैसे वाटताना पाहून अनेक लोक तिच्या गाडीजवळ जमा झाले आणि तिला घेराव घातला. लोक पैसे मिळवण्यासाठी मास्क घालून नेहाकडे धावू लागले, त्यामुळे घाबरून नेहाने कारची खिडकी वर करून निघून जाण्याचा प्रयत्न केला, पण ती खूप अस्वस्थ झाल्याने ती गाडीच्या सीटवर पुढे सरकली आणि खिडकी करून तिथून बाहेर पडली.
जेव्हा नेहा कक्करचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला तेव्हा काहींनी नेहाच्या कामाचे कौतुक केले तर काहींनी याला धोकादायक म्हटले. एकाने लिहिले की, तुम्ही ५००च्या नोटा दिल्या तर लोक रांगा लावतील. चिंता व्यक्त करताना एकाने लिहिले की ‘हे खूपच धोकादायक आहे.
सेलिब्रिटींनी हे करू नये, कुणाचे नुकसान झाले असते तर?’ यावर एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की, ‘दिले तरी पण समस्या नाही दिले तरी समस्या’. त्याचवेळी नेहा कक्करच्या या व्हिडिओवर एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की, ‘रश्मिकाचा असाच एक व्हिडिओ समोर आला होता, पण तिने पैसे दिले नाहीत, तेव्हा लोकांनी कमेंट केली.
त्यावेळी लोकं म्हणाली की, काही पैसे दिले असते तर काय झाले असते, पण आता जेव्हा नेहाने पैसे दिले मग लोकांच्या वेगवेगळ्या कमेंट का येत आहेत. यावरून हे सिद्ध होते की लोक इथे इतरांना न्याय देण्यासाठी बसले आहेत, त्यांनी स्वतः असे काही केले आहे की नाही.
महत्वाच्या बातम्या
धुम्रपान तुम्ही करताय पण परिणाम नातवंडांना सहन करावे लागणार, संशोधकांचा मोठा खुलासा
खुन्नस ठेवून मित्रानेच काढला काटा; मुळशी पॅटर्न पाहून केला खून, आरोपीची पोलिसांकडे कबुली
‘औरंगाबादमधील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देणार; उद्धव ठाकरेंची घोषणा
‘मविआ सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?’ सोमय्यांना दिलेल्या नोटीशीमुळे फडणवीसांचा हल्लाबोल