नेहाने धुपीयाने मुलीला स्तनपान करतानाचा ‘तो’ फोटो केला शेअर अन् ट्रोलर्सची चांगलीच जिरवली

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन चर्चेत असते. त्यामुळे अनेकदा नेटकरी तिला ट्रोल करत असतात. पण ती ट्रोलर्सला सुद्धा खडे बोल सुनावताना दिसून येते.

अनेकदा ट्रोल करणारा व्यक्ती आपली हद्द पार करत असतो. आता असाच एक व्यक्ती आपली हद्द पार करत असताना नेहाने त्याला सडेतोड उत्तर दिले आहे. एका व्यक्तीने एका महिलेकडे ब्रेस्ट फिडिंगचा व्हिडिओ मागितला होता, आता नेहाने त्याला उत्तर दिले आहे.

एका महिलेला ब्रेस्ट फिडिंगचा व्हिडिओ मागणे हे नेहाला पटले नव्हते. त्यामुळे तिने चक्क तिची मुलगी मेहरला दुध पाजतानाचा एक फोटो शेअर केला आहे. त्यासोबत तिने कॅप्शनमध्ये त्या माणसाला चांगलेच सुनावले आहे.

नेहाने इन्स्टाग्रामवर हा ब्रेस्ट फिडिंगचा फोटो शेअर केला आहे. तसेच कॅप्शनमध्ये म्हटले की, मी अशा पद्धतीच्या कमेंटकडे दुर्लक्ष करते किंवा ती डिलिट करते. मात्र मला आता एक गोष्ट सगळ्यांसमोर आणावी असे वाटत आहे. अशा मानसिकतेचे लोक ब्रेस्ट फिडिंगला चुकीच्या पद्धतीने घेत असतात, असे नेहाने म्हटले आह.

तसेच नव्या आईचा प्रवास काय असतो ती एक आईच समजू शकते. एका बाजूला आई होण्याचा आनंद तर दुसऱ्या बाजूला नव्या जबाबदाऱ्या. आई होणं खुप कठिण आहे. या परिस्थितीत त्या सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचे आहे. मात्र आजही लोक ब्रेस्टफिडिंगला चुकीच्या नजरेने पाहतात, असे नेहाने म्हटले आहे.

मी जेव्हापासून आई झाली आहे, तेव्हापासून मी सार्वजनिक ठिकाणीच दुध पाजण्याला प्राधान्य दिले आहे. या गोष्टींबाबत सर्वांनी संवेदनशील व्हायला हवे, असेही नेहाने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून अभिनेत्री आयशा झुल्काने कधीच आई न होण्याचा निर्णय घेतला; कारण वाचून धक्का बसेल
कोण आहेत प्यारे खान? ज्यांनी गरीब रूग्णांना ऑक्सिजन मिळावा म्हणून ८५ लाख खर्च केले
श्रीमंतांना सोडण्यासाठी दबाव, दिवाळीत सोन्याची बिस्कीटं; परमबीर सिंगाविरोधात अधिकाऱ्याचे गंभीर आरोप

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.