..त्यामुळे करण जोहरने मला तीन वेळा लग्नासाठी नकार दिला होता, नेहा धुपियाचा खुलासा

दिग्दर्शक करण जोहर हा बॉलिवूडमधील एक लोकप्रिय दिग्दर्शक मानला जातो. करण जोहरने बॉलिवूडला आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्याने दिग्दर्शन केलेले अनेक रॉमँटिक चित्रपट आजही लोक आवडीने पाहतात. करण जोहर असा व्यक्ती आहे ज्याच्या बॉलिवूडमध्ये खुप ओळखी आहेत.

पण हे खुप कमी जणांना माहिती आहे की करणच्या एका मैत्रीणीने चक्क त्याला लग्नासाठी मागणी घातली होती. पण तीन वेळा मागणी घालूनही त्याने लग्नाला नकार दिला होता. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून त्याची जवळची मैत्रिण नेहा धुपिया होती.

नेहाने त्याला लग्नासाठी तीनवेळा मागणी घातली होती पण तिन्ही वेळा त्याने लग्नाला नकार दिला होता. याचा खुलासा स्वता नेहाने एका मुलाखतीत केला आहे. नेहाच्या नो फिल्टर नेहा या टॉक शोमध्ये करण जोहर आला होता. त्यावेळी नेहाने हा खुलासा केला आहे.

मी विनोद म्हणून करणला तीन वेळा लग्नासाठी मागणी घातली होती पण त्याने तिन्हीवेळेस नकार दिला होता. मी आतापर्यंत एकाच पुरूषाला लग्नासाठी विचारले होते. त्याने मला नकार दिला त्यामागे अनेक कारणे होती. त्यातील एक कारण असे होते की त्याला माझ्या शरीराच्या कोणत्याही पार्टमध्ये इंट्रेस्ट नाही, असे नेहा म्हणाली आहे.

दरम्यान, नेहा अनेकवेळा करणसोबत फोटो शेअर करत असते. ते दोघे खुप चांगले मित्र आहेत. एकदा करणच्या वाढदिवसाच्या दिवशी तिने एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. तिने लिहीले होते की, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा करण, असाच न थांबता मोठा हो.

माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे, असे कॅपशन तिने त्या पोस्टला दिले होते. करण जोहरने लग्न केलेले नाही. एका मुलाखतीत त्याने सांगितले होते की जर त्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला असता तर त्याने करिना करूपशी लग्न केले असते. तसेच कॉफी विथ करणमध्ये त्याने खुलासा केला होता की अनुष्का शर्मा त्याची क्रश होती.

महत्वाच्या बातम्या
मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्याचे भाजपशी थेट संबंध; सर्वच पुरावे झाले उघड
मोठी बातमी! हिटमॅन रोहीत शर्माकडे सोपवणार टिम इंडीयाच्या कर्णधार पदाची जबाबदारी
देशातील ६० टक्के कोरोना रुग्णांचा मृत्यु कोरोनाने नाही तर ‘या’ कारणामुळे झाला; धक्कादायक माहिती उघड
बॉलीवूडमध्ये अपयश, घरच्यांनी सोडले, राज किरण यांना करावे लागले मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.