आशियातील सर्वात पावरफुल बिजनेस वुमनमध्ये नीता अंबानीचे नाव सर्वात पहिले येते. भारतातील सर्वात श्रीमंत बिजनेस मॅन मुकेश अंबानीच्या त्या पत्नी आहेत. त्यामुळे त्यांची लाईफस्टाईल देखील तशीच महाग आहे.
त्यांच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्यात लोकांना देखील खुप रुची आहे. आज आपण नीता अंबानीच्या महागड्या लाइफस्टाइलबद्दल जाणून घेणार आहोत. त्यांच्या फॅशन कलेक्शनबद्दल माहिती करून घेणार आहोत.
१)महागड्या गाड्यांचे कलेक्शन – नीता अंबानीला गाड्या खूप आवडतात. त्यामुळे त्यांच्याकडे एका एक महाग गाड्या आहेत. बॉलीवूडच्या सुपेरस्टार्स पेक्षा जास्त गाड्या नीता अंबानीकडे आहेत. त्यांच्याकडे मर्सिडीज एस क्लास ही सर्वात महाग गाडी आहे. ह्या गाडीची किंमत २.७३ करोड आहे. मेबाख ६२ एस ची किंमत ६.८४ करोड रुपये आहे. अशा अनेक महागड्या गाड्यांचे कलेक्शन नीता अंबानीकडे आहे.
२)ब्रँडेड शुज – असे बोलले जाते की, नीता अंबानी एकदा घातलेले शुज आणि चप्पल परत घालत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे लाखोंच्या शुजचे कलेक्शन आहे. त्यांच्याकडे जिम्मी चु, प्राडा अशा ब्रँडेड कंपनीचे शुज आणि चप्पल आहेत.
३) लाखोंचे दागिने – नीता अंबानी अनेक कार्यक्रमांमध्ये उपस्थित असतात. त्यांचा प्रत्येक लुक मीडियामध्ये चर्चेचा विषय बनतो. त्या प्रत्येक लुकसोबत महागडे दागिने घालतात. त्या एकदा घातलेले दागिने परत घालत नाहीत.
४) महागड्या लिपस्टीक – नीता अंबानी त्यांच्या मेकअपकडे देखील खुप जास्त लक्ष देतात. त्यांना मेकअप करायला खुप आवडते. म्हणून त्यांच्याकडे असणाऱ्या एका लिपस्टिकची किंमत ४० लाख रुपये आहे. त्या खास ऑर्डर देऊन लिपस्टिक बनवून घेतात.
५)साड्या – नीता अंबानीचा प्रत्येक लुक खुप व्हायरल होत असतो. खास करून त्यांचा साडीतला लुक खुप व्हायरल होतो. त्यांच्या एका साडीची किंमत ६० लाख आहे. त्यांच्या साडीवर खास सोने आणि चांदीने नक्षीकाम केले जाते.
महत्वाच्या बातम्या –
एका एपिसोडसाठी ‘एवढे’ मानधन घेतो तारक मेहतामधील बाघा; आकडा वाचून धक्का बसेल
बर्थडे स्पेशल: ‘रामायण’ मालिकेनंतर अरुण गोविल यांचे करिअर झाले होते खराब; जाणून घ्या कारण
बाॅलीवूडचा सर्वात यशस्वी खलनायक महेश आनंदचा मृतदेह दोन दिवस सडत पडला होता..
श्रीदेवीचा राग कमी करण्यासाठी अमिताभ बच्चनने पाठवली होती टेम्पोभर गुलाबाची फुलं