‘जैवलिन – एक प्रेम कथा’ ‘गोल्डन बॉय’ची जाहिरात क्षेत्रात दमदार एंन्ट्री..

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने ८७ मीटर पेक्षा लांब भाला फेकत सुवर्ण पदक कमवत आपले नाणे किती खणखणीत वाजते हे साऱ्या जगाला ठणकावून सांगितले. भालाफेकमध्ये प्रथमच एका भारतीयाने ऑलिम्पिमध्ये सुवर्ण पदक जिंकून इतिहासात आपले नाव अजरामर केले.

ऑलिम्पिकमध्ये मैलाचा दगड पार केल्यानंतर नीरज चोप्रावर कौतुक आणि बक्षिसांचा पाऊस झाला. एका रात्रीत त्यावर कोट्यवधी रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव झाला. नुकतेच नीरजने एका नव्या जाहिरातीत केलेल्या अभिनयाने तर त्याला पुन्हा एकदा चर्चेत आणले आहे.
सुवर्णपदक मिळवल्यानंतर अनेक कंपन्या त्याला जाहिरातींमध्ये घेण्यास इच्छुक होत्या.

यानंतर त्याने नुकतेच एक जाहिरातीमध्ये काम केले असून या जाहिरातीमध्ये नीरज मीडिया पर्सन, कॉर्पोरेट सीईओ, बँक मॅनेजर, बॉलिवूड निर्माता असं बनून हास्यास्पद संवाद बोलताना दिसत आहे. ही जाहिरात क्रेड क्लबची असून त्याने कॅप्शनला 360 डिग्री मार्केटिंग… असं लिहित त्याने या जाहिरातीचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याच्या या व्हिडीओला असंख्य व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नीरजने जाहिरात करण्यासाठी घेणाऱ्या फिसमध्ये तब्बल दहापट वाढ केली आहे. त्यामुळे नीरज आता जाहिरातीसाठी सर्वाधिक शुल्क आकारणाऱ्या खेळाडूंच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.

सुवर्ण पदक जिंकण्याआधी नीरज जाहिरातींच्या माध्यमातून १५ ते २० लाख रुपये कमवत होता. आता दहापट वाढ केल्याने वर्षाला नीरज १.५ ते २ कोटी किंव्वा त्यापेक्षा जास्त पैसे जाहिरातीमधून कमवणार आहे.

दरम्यान नुकतेच तो KBC च्या मंचावर आला होता. यावेळीही त्याने तिथे अमिताभ बच्चन यांच्यासोबत खूप गप्पा मारल्या होत्या.

 

महत्वाच्या बातम्या
“कोरोना काळात संघाच्या स्वयंसेवकांनी केलेली निस्वार्थ सेवा म्हणजे हिंदुत्व”
तालिबान्यांमध्ये यादवी! अंतर्गत धुमश्चक्रीत सर्वोच्च नेता अखूंदजादा ठार; बरादर गंभीर जखमी
रितेश देशमुख आणि जिम ट्रेनरमध्ये मारहाण; हात जोडून रितेश देशमुखने मागितली माफी, म्हणाला…
आमदार लंकेंसोबत वादानंतर तहसिलदारांची बदली; आता सुरू झाला वाळूमाफीयांचा धुडगूस

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.