काय सांगता!!!नीरज चोप्राची थेट टक्कर आता विराट कोहलीसोबत? गोल्डन बॉयला सोन्याची किंमत!! वाचा सविस्तर

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने ८७ मीटर पेक्षा लांब भाला फेकत सुवर्ण पदक कमवत अपले नाणे किती खणखणीत वाजते हे साऱ्या जगाला ठणकावून सांगितले. भालाफेकमध्ये प्रथमच एका भारतीयाने ऑलिम्पिमध्ये सुवर्ण पदक जिंकून इतिहासात आपले नाव अजरामर केले.

ऑलिम्पिकमध्ये मैलाचा दगड पार केल्यानंतर नीरज चोप्रावर कौतुक आणि बक्षिसांचा पाऊस झाला. एका रात्रीत त्यावर कोट्यवधी रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव झाला. नीरजने केलेल्या या कामगिरीमुळे तो प्रकाशझोतात आला आणि सर्वत्र त्याची चर्चा सुरू झाली.

नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार नीरजने जाहिरात करण्यासाठी घेणाऱ्या फिसमध्ये तब्बल दहापट वाढ केली आहे. त्यामुळे नीरज आता जाहिरातीसाठी सर्वाधिक शुल्क आकारणाऱ्या खेळाडूंच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. सुवर्ण पदक जिंकण्याआधी नीरज जाहिरातींच्या माध्यमातून १५ ते २० लाख रुपये कमवत होता. आता दहापट वाढ केल्याने वर्षाला नीरज १.५ ते २ कोटी किंव्वा त्यापेक्षा जास्त पैसे जाहिरातीमधून कमवणार आहे.

नीरजने केलेल्या या शुल्कवाढीमुळे त्याने के. एल. राहुल, रोहित शर्मा यांच्यासारख्या मातब्बर खेळाडूंना देखील मागे टाकले आहे. जाहिरातींच्या स्पर्धेत नीरज चोप्रा आता थेट भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला टक्कर देताना दिसणार आहे. नीरजपेक्षा विराट कोहली जाहिरातींसाठी जास्त शुल्क आकारतो मात्र नीरज चोप्रा आता विराटला देखील जाहिरातींच्या बाबतीत मागे टाकू शकतो असे चित्र निर्माण झाले आहे.

नीरज चोप्राचे व्यवस्थापन पाहणाऱ्या कंपनीचे अधिकारी मुस्तफा घोष यांनी सांगितले की, नीरजला आपल्या जाहिरातींमध्ये घेण्यास अनेक ब्रँड्स इच्छुक असून त्यांच्यासोबत चर्चा चालू आहे.

पुढील काही दिवसांत त्यांच्यासोबत निरज करारबद्ध होऊ शकतो, हा करार २०२४ साली होणाऱ्या ऑलिम्पिक पर्यंत असणार आहे. नीरज चोप्राचे यश नक्कीच हेवा वाटणारे असले तरी टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही हे मात्र आपल्याला विसरुन चालणार नाही.

 

महत्वाच्या बातम्या
जगातील अशी ६ ठिकाणं जिथे कधीच होत नाही अंधार; रात्रीच्या १२ वाजताही चमकत असतो सुर्य
पैसे खूप खर्च होत आहेत? जाणून घ्या, पैसे वाचवण्याचे सोपे मार्ग…
अक्षय कुमारवर कोसळला दुःखाचा डोंगर, रडून रडून झाला बेहाल; केली ‘अशी’ भावनिक पोस्ट
आज मला असह्य दुख: होतय! आईच्या निधनानंतर अक्षयकुमारने जे लिहीलंय ते वाचून ढसाढसा रडाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.