विवाहीत पुरुषांच्या प्रेमात पडू नका; अभिनेत्री नीना गुप्ताचा चाहत्यांना सल्ला

फिल्म इंडस्ट्रीतील प्रभावशालि अभिनेत्रींमध्ये नीना गुप्ताच्या नावाचा समावेश होतो. दोन वेळेस राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या नीना गुप्ता आजही लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. बधाई हो सारख्या चित्रपटामध्ये काम करुन त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप सोडली आहे.

नीना गुप्ताचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहे. त्यासोबतच लोकांनी त्यांचे भरभरुन कौतूक देखील केले आहे.

पण सर्वात जास्त चर्चा नीनाने चाहत्यांना दिलेल्या एका सल्ल्याची होत आहे. त्यांनी चाहत्यांनी सांगितले की, ‘तुम्ही कधीही विवाहीत पुरुषाच्या प्रेमात पडू नका. मी त्या परिस्थीमधून गेले आहे. त्यामूळे मला त्याचा चांगलाच अनूभव आहे’.

स्त्री असो किंवा पुरुष तुम्ही कधीच विवाहीत व्यक्तिच्या प्रेमात पडू नका. कारण त्या नात्यात आनंद खुप कमी वेळ असतो. त्या नात्याला सांभाळण आणि समोरच्या व्यक्तिची वाट बघणे तुम्हाला आतून त्रास देते. शेवटी नकार सहन करणे खुप कठिण जाते.

या सर्व गोष्टींचा अनूभव नीना गुप्तांनी घेतला आहे. कारण त्या देखील एका विवाहीत पुरुषाच्या प्रेमात पडल्या होत्या. त्यामूळे त्यांना आयूष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. या सर्व कारणांमूळे त्यांनी चाहत्यांना सल्ला दिला आहे.

नीना गुप्ता यांनी ‘गांधी’ चित्रपटापासून आपल्या अभिनय प्रवासाची सुरुवात केली होती. त्यानंतर १९८२ मध्ये ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटामध्ये त्यांनी काम केले. या चित्रपटातील त्यांची भुमिका खुप प्रसिद्ध झाली.

या कालावधीमध्ये नीनांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये अनेक बदल झाले. नीना आणि क्रिकेटर व्हिवीयन रिचर्डस यांचे प्रेम जुळले. या दोघांच्या नात्याची त्या काळात खुप चर्चा झाली होती.

पण तरीही या दोघांचे नाते कायम होते. १९८८ मध्ये नीना गुप्ता गरोदर राहिल्या होत्या. पण व्हिवीयन रिचर्डस अगोदरपासून विवाहीत होता. त्यामूळे त्यांनी नीनाशी लग्न करण्यास नकार दिला.

व्हिवीयनने लग्नाला नकार दिल्यानंतर नीना यांनी स्वत त्यांच्या बाळाची जबाबदारी घेतली होती. त्यांनी कोणावरही आधारित राहणे पसंत केले नाही. त्यांच्या याच अनूभवामूळे त्यांनी चाहत्यांच्या विवाहीत व्यक्तिच्या प्रेमात पडू नका असा सल्ला दिला आहे.

महत्वाच्या बातम्या –

केवळ एवढ्याश्या गोष्टीसाठी कंगना राणावत आणि संजय दत्तची मैत्री तुटली होती

मला किस करशील का? चाहत्याच्या प्रश्नावर जान्हवी कपूरने दिले भन्नाट उत्तर

सनी देओलमूळे धर्मेंद्रने बोनी कपूरला दिली होती धमकी; वाचा पुर्ण किस्सा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.