NCP : राज्याचे राजकीय वातावरण तापलेले असताना आता आणखी एक वादाचा मुद्दा उद्भवलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र एकनाथ शिंदे यांच्याबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीने ही माहिती समोर आणत यावर प्रश्न उपस्थित केला आहे.
राष्ट्रवादीचे नेते रविकांत वरपे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीवर बसून राज्यकारभार पाहत असल्याचा दावा वरपेंनी केला आहे. तसेच त्यांनी श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल शुभेच्छाही दिल्या आहेत.
खा.श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा.
मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात.लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरूय.हा कोणता राजधर्म आहे?असा कसा हा धर्मवीर?@mieknathshinde @DrSEShinde pic.twitter.com/rpOZimHnxL— Ravikant Varpe रविकांत वरपे (@ravikantvarpe) September 23, 2022
“खा. श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्रीपदाचा कारभार सांभाळतात. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू आहे. हा कोणता राजधर्म आहे? असा कसा हा धर्मवीर?,” असे रविकांत वरपे यांनी या ट्विटमध्ये लिहिले आहे.
याविषयी बोलताना रविकांत वरपे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानातील कार्यालयामध्ये त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे हे खुर्चीवर बसून राज्याचा कारभार पाहतात. मुख्यमंत्री दिल्लीला गेले असल्यामुळे किंवा ते दहीहंडी, गणेशोत्सव अशा उत्सवांमध्ये व्यस्त असल्यामुळे कदाचित त्यांनी आपल्या राज्याचा कारभार त्यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे सुपूर्त केला आहे का? असा त्यांना संशय असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
तसेच श्रीकांत शिंदेंना सुपर सीएम झाल्याबद्दल मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो, असेही ते म्हणाले आहेत. पुढे ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान हे शासकीय असते, तिथले कार्यालयदेखील शासकीय असते आणि तिथे शासकीय बैठका होत असतात. तसेच त्या फोटोच्या मागे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असा महाराष्ट्राच्या राजमुद्रेचा लोगो लावलेला दिसत असल्याचेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही. त्यामुळे कदाचित त्यांनी आपल्या चिरंजीवाला हे शासकीय कामकाज पाहण्यासाठी पुढे केले की काय?, असा संशय येत असल्याचे रविकांत वरपे यांनी म्हटले आहे. राज्यातील राजकारणात पुन्हा नव्या वादाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणावर आता श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्र्यांकडून काय प्रतिक्रिया येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
uddhav thackeray : दिल्लीत मुजरा आणि गल्लीत गोंधळ अशी मिंधे गटाची अवस्था; उद्धव ठाकरेंनी नाव न घेता मुख्यमंत्री शिंदेंना डिवचलं
uddhav thackeray : दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार; उद्धव ठाकरेंनी थोपटले दंड अन् मुख्यमंत्री शिंदेंना फुटला घाम
Dussehra Gathering : “जिथे उद्धव ठाकरे उभे राहतील तिथेच…”, दसरा मेळाव्याबाबत लक्ष्मण हाकेंचं सूचक विधान
Anil Parab : “जोपर्यंत शिवाजी पार्कचा निर्णय…”, दसरा मेळाव्याबाबत अनिल परबांचं मोठं विधान