“सोमय्यांना कोल्हापूरी हिसका दाखवणार, त्यांचा हा शेवटचा स्टंट असेल”

गेल्या काही महिन्यांपासून भाजप नेते किरीट सोमय्या महाविकास आघाडी नेत्यांवर खुप आक्रमक झालेले दिसून येत आहे. तसेच ते मंत्र्यांवर गंभीर आरोपही करताना दिसून येत आहे. नुकताच त्यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर मनी लाँड्रींगचा आरोप केला आहे.

हसन मुश्रीफांच्या कुटुंबाने बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही, तर २७०० पानांचे पुरावेही किरीट सोमय्यांनी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या हवाली केले आहे. मुश्रीफांच्या कुटुंबाने १२७ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

अशातच किरीट सोमय्या यांनी सोमवारी घोरपडे कारखान्यासह कागल मतदारसंघात काही ठिकाणीही भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात संतापाची लाट असताना दौरा आखून त्यांनी कोल्हापूरकरांना आव्हान दिले आहे. त्यामुळे त्यांना कितीही सुरक्षा दिली तरी त्यांना कोल्हापूरी हिसका दाखवू, असे जाहीर आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसने दिले आहे.

मुश्रीफ यांच्यावर किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप म्हणजे निव्वळ स्टंट आहे. हिंमत असेल तर सोमय्या यांनी जनतेच्या प्रश्नांना उत्तर द्यावीत, असे आव्हान कोल्हापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुखांच्या पत्रकार परिषदेत देण्यात आले आहे.

किरीट सोमय्या हे सोमवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याचे समजते. त्या पार्श्वभुमीवर आम्ही जनता, कार्यकर्ते, सरसेनापती, साखर कारखान्याचे सभासद शेतकरी, हजारे निराधार माता-भगिनी आणि रुग्ण कागलमध्ये जमत आहोत. आम्हाला भेटूनच त्यांनी पुढे जावे, असे आव्हान राष्ट्रवादीने किरीट सोमय्या यांना केले आहे.

तसेच सोमय्या यांनी जे प्रश्न उपस्थित केले आहे, त्यांची माहिती सविस्तर देऊ, असे निवेदन हसन मुश्रीफांनी केले होते. तरीही कोल्हापूर दौरा, कागल आणि कारखाना ही स्टंटबाजी कशासाठी? सोमवारी सकाळी १० वाजता कागलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ३० हजारांपेक्षा जास्त जनता जमणार आहे. आमच्या प्रश्नांची उत्तरे देऊनच सोमय्यांनी पुढे जावे, अस जिल्हा बँकेचे संचालक प्रताप माने यांनी म्हटले आहे.

प्रतिकूल परिस्थितीतून सरसेनापती घोरपडे साखर कारखान्याची उभारणी झाली आहे. ४० हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी सोने तारण ठेवून सभासदस्व घेतले आहे. बिनबुडाचे व सनसनाटी आरोप, वक्तव्ये करुन सोमय्यांनी स्टंटबाजी करायची, हा सोमय्यांचा छंद आहे, पण कदाचित त्यांचा हा शेवटचा स्टंट ठरेल, असे बिद्रीचे संचालक प्रवीण सिंह भोसले यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक! कर्म पूजेदरम्यान विसर्जनासाठी गेलेल्या ७ मुलींचा तलावात बुडून मृत्यू
भाजपचे लोक एक दिवस मराठी माणसालाच मुंबईतला परप्रांतीय ठरवतील; संजय राऊतांचा भाजपला टोला
साताऱ्याचे सुपुत्र सोमनाथ मांढरे यांना लडाखमध्ये आले वीरमरण; १० महिन्यांची चिमुरडी झाली पोरकी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.