माफी मागा अन्यथा जिथे दिसेल तिथे वंगण फासू; राष्ट्रवादीच्या महिला प्रवीण दरेकरांवर आक्रमक

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रवीण दरेकरांवर टीका करत आहे. तसेच राष्ट्रवादीच्या महिलाही दरेकरांवर आक्रमक झाल्याच्या दिसून येत आहे.

राष्ट्रवादीच्या महिलांकडून प्रवीण दरेकरांवर संताप व्यक्त केला जात आहे. तसेच काही महिला या रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहे. आता राष्ट्रवादी युवती काँग्रेसने देखील प्रवीण दरेकरांना माफी मागण्याचा इशारा दिला आहे.

प्रवीण दरेकर यांनी माफी मागावी अन्यथा तोंडाला वंगण फासू असा इशारा युवती प्रदेशाध्यक्ष सक्षण सलगर यांनी दिला आहे. सक्षण सलगर यांनी वंगण फासण्याचे वक्तव्य केल्यामुळे आता हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

तुम्हाला जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी विरोधी पक्षनेते पद देण्यात आले आहे, महिलांचे चारित्र्यहनन करण्यासाठी नाही. महिलांबद्दल बोलताना तुम्ही राज्याचे वरच्या सभागृहातील विरोधी पक्षनेते आहात याचे भान ठेवायला हवे होते, असे सक्षण सलगर यांनी म्हटले आहे.

तसेच भाजपचे नेते सतत महिलांच्या विरोधात वक्तव्य करत असतात. याआधीही आमदार राम कदम यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. कोणतीही मुलगी आवडली तर तिला उचलून आणू, अशी संतापजनक भाषा केली होती, असेही सक्षण सलगर यांनी म्हटले आहे.

भाजप नेते, आमदार अशा प्रकारे महिला, मुलींबद्दल बरळत असतांना त्यांना आवर घातला जात नाही. राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा अशा गोष्टींना पाठिंबा आहे का? असा सवालही यावेळी सक्षण सलगर यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

सोनू सूदच्या ६ मालमत्तांवर इन्कम टॅक्सची धाड; लोकांच्या मदतीला सोनूकडे पैसे आले कुठून?, आयटीचा प्रश्न
भाजपमध्येही अमृता फडणवीस कलाकार आहेत, यांच्याबाबत दरेकर असेच बोलणार का?
“जगात सर्वात सभ्य आणि सहिष्णू हिंदूच” ‘त्या’ वादावर जावेद अख्तर यांची पहिली प्रतिक्रिया

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.