राष्ट्रवादी व्यंकय्या नायडूंना ‘जय भवानी, जय शिवाजी’ लिहून २० लाख पत्रे पाठवणार

 

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिराबाबत बोलताना, राम मंदिर बांधल्याने कोरोना जाणार का? असे विधान केले होते.

या विधानाने भक्तांच्या भावना दुखवल्याचा आरोप भाजपने केला होता. तसेच भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी शरद पवारांना १० लाख पत्रे ‘जय श्रीराम’ लिहून पाठवणार असल्याचे म्हटले होते.

आता याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून भाजपला जोरदार उत्तर देण्यात येणार आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना २० लाख पत्रे पाठवण्यात येणार आहे. या पत्रांवर ‘जय भवानी जय शिवाजी’ अशी घोषणा असणार आहे.

भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली होती.

उदयनराजे यांच्या घोषणेवर व्यंकय्या नायडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच अशा घोषणा देऊ नये अशी समज दिली आहे. याच पार्श्वभूमीवर ही पत्रे पाठवण्यात येणार आहे.

अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष मेहबूब शेख यांनी एका वृत्तवाहिनी बोलताना दिली आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्या १० लाख पत्रांना राष्ट्रवादी जशास तसे उत्तर देत २० लाख पत्रे पाठवणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.